भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात, जनजागृती

 भागोजी शेठ कीर यांचा जयंती सोहळा उत्साहात, जनजागृती

मुंबई, दि. १० : अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर सचिव प्रकाश कांबळी, खजिनदार शलाका पांजरी आणि साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अलका नाईक यांनी उरण- बोरी गाव, ज्येष्ठालय, येथे भंडारी हितवर्धक समाज, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती सभा संपन्न झाली. या सभेत महामानव भागोजीशेठ कीर यांच्याबद्दल सविस्तर माहिती आणि रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दादर-मुंबई येथे होणाऱ्या रथयात्रेसाठी सर्वांना हार्दिक आमंत्रण दिले. उरण येथील भंडारी समाजाने या रथयात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे महासंघाच्या अध्यक्षांनी सर्वांना आवाहन केले.

याप्रसंगी येथील स्थानिक भंडारी कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष दिनेश हळदणकर, ‌सचिव स्वप्नील मयेकर, उपाध्यक्षा रेश्मा मयेकर, ‌मिलींद तळेकर आदींसह अनेक रसिक श्रोतेही उपस्थित होते. अध्यक्ष हळदणकर यांचा सन्मान अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या वतीने डॉ. अलका नाईक यांनी केला. तसेच महासंघाच्या अध्यक्षांचे व मान्यवरांचे स्वागत सन्मान स्थानिक समितीने समस्त उरणवासियांच्या वतीने केले.

या कार्यक्रमासाठी उरण भंडारी हितवर्धक समाजातील डॉक्टर मेकर, संजू कांबळी, संतोष कांबळी, सुप्रिया पुसाळकर, सारजा कांबळी, सपना शिलदंणकर, कल्याणी हळदणकर, प्रिती शिलधनकर असे अनेक सदस्य उपस्थित होते त्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली. तसेच मंडळाच्या उपाध्यक्षा रेशमा मयेकर यांनी पुढाकार घेऊन सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *