दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आली नाही; सरकारची संसदेत महत्वाची माहिती

 दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आली नाही; सरकारची संसदेत महत्वाची माहिती

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात सुमारे 2000 रुपयांच्या चलनी नोटांबाबत (2000 rupees currency notes) विविध प्रकारचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, सरकारने संसदेत यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई झालेली नाही. या निर्णयाकडे उच्च मूल्याच्या चलनी नोटा जमा करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठीच्या उद्देशाने पाहिले जात आहे.
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सांगितले की, 20 मार्च 2018 पर्यंत 2000 च्या नोटांच्या (2000 rupees currency notes) 336.2 कोटी चलनी नोटा व्यवहारात आल्या होत्या. ज्या यंत्रणेतील एकूण चलनाच्या 3.27 टक्के आहेत. त्याच वेळी, 26 फेब्रुवारी 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार व्यवहारात, 2000 च्या 249.9 कोटी नोटा होत्या, ज्या व्यवहारातील एकूण चलनाच्या 2.01 टक्के राहिल्या आहेत.
अर्थ राज्यमंत्री म्हणाले की रिझर्व्ह बँकेचा (RBI) सल्ला घेतल्यानंतर सरकार विशिष्ट किंमतीच्या चलनी नोटा छापण्याचा निर्णय घेते. यामध्ये व्यवहारासंदर्भात जनतेकडून होणारी मागणी लक्षात ठेवली जाते.
रिझव्‍‌र्ह बँकेने (RBI) 2019 मध्ये सांगितले होते की 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपये किंमतीच्या 354.29 कोटी चलनी नोटा छापण्यात आल्या होत्या. परंतू 2017-18 मध्ये 2000 रुपयांच्या 11.15 कोटी नवीन नोटा आणि 2018-19 मध्ये 4.66 कोटी नवीन नोटा छापण्यात आल्या.

नोव्हेंबर 2016 मध्ये पहिल्यांदाच छापण्यात आल्या 2000 च्या नोटा
The 2000 notes were first printed in November 2016

देशात 2000 रुपयांच्या चलनी नोटा पहिल्यांदा नोव्हेंबर 2016 मध्ये छापण्यात आल्या. सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून काढून घेतल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा (2000 rupees currency notes) छापण्याचा निर्णय घेतला होता. नोटाबंदीचा उद्देश काळा पैसा आणि बनावट चलन रोखणे हा होता. नंतर सरकारने 500 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. मात्र, 1000 रुपयांच्या नोटा अद्याप पुन्हा चलनात आलेल्या नाहीत. सध्या, 2000 रुपयांव्यतिरिक्त 500, 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा व्यवहारात आहेत.
Various estimates are being made in the country about 2000 rupee currency notes. Meanwhile, the government has given important information in Parliament in this regard. Minister of State for Finance Anurag Thakur in a written reply to a question in the Lok Sabha on Monday said that Rs 2,000 notes have not been printed since April 2019.
PL/KA/PL/16 MAR 2021
 

mmc

Related post