गत आर्थिक वर्षात कर संकलनात १६.९७ टक्के वाढ

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या विकासकामांसाठी आर्थिक हातभार लावणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर संकलनातून संकलित होणारा निधी. कर संकलनाच्या बाबतीत गत आर्थिक वर्षांत समाधानकारक आणि उत्साहवर्धक कामगिरी घडल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रत्यक्ष कर संकलन केंद्रीय अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 2.41 लाख कोटी रुपयांनी म्हणजेच 16.97% ने जास्त झाले असल्याचे आज अर्थमंत्रालयाने जाहीर केले.
प्रत्यक्ष कर म्हणजे काय? जेव्हा कराघात व करभार एकाच व्यक्तीवर पडतात, तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. प्रत्यक्ष कर ज्या व्यक्तीवर बसविला जातो, त्यालाच हा कर भरावा लागतो. प्रत्यक्ष कर कराचे संक्रमण होत नाही. उदा,- भांडवली लाभ कर, प्राप्ती कर, वारसा कर इ. प्रत्यक्ष कर आहेत. प्रत्यक्ष कराचे फायदे १) प्रत्यक्ष करामुळे अर्थव्यवस्थेते समानता प्रस्थापित होते. २) हा कर करदात्याच्या क्षमतेनुसार आकारला जातो. ३) प्रत्यक्ष करात उत्पादकता आढळते. ४) या कराच्या वसुलीचा खर्च कमी असतो. ५) प्रत्यक्ष कर चुकविता येत नाहीत. SL/KA/SL 3 April 2023