मुंबई सोबत ठाण्यातही 15 टक्के पाणी कपात

 मुंबई सोबत ठाण्यातही 15 टक्के पाणी कपात

ठाणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला गळती निर्माण झाली असून या जलबोगद्याच्या दुरूस्तीचे काम 31 मार्च पासून हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कारणास्तव बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 31 मार्च पासून पुढील 30 दिवस 15% पाणी कपात लागू राहणार आहे. परिणामी ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या परिसराला देखील पाणी कपात लागू राहणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी कपात पुढील परिसरांना लागू राहणार आहे. गावदेवी जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणारा परिसर – नौपाडा, गोखले रोड, स्टेशन परिसर, बी केबीन, राम मारुती मार्ग उजवी बाजू, महागिरी, खारकर आळी, चेंदणी, खारटन रोड, मार्केट परिसर.

टेकडी बंगला जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणारा परिसर – टेकडी बंगला, वीर सावरकरपथ, संत गजानन महाराज मंदिर पर्यत, पाचपाखाडी, नामदेववाडी, भक्ती मंदिर रस्ता, सर्व्हिस रस्ता.

कोपरी कन्हैयानगर व धोबीघाट जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणारा परिसर – कोपरी गाव, ठाणेकरवाडी, सिंधी कॉलनी, साईनाथनगर, साईनगर, कोळीवाडा, सिडको संपूर्ण कोपरी (पूर्व), आनंदनगर, गांधीनगर, कान्हेवाडी, केदारेश्वर, संपूर्ण ठाणे पूर्व परिसर.

हाजुरी कनेक्शन मार्फत थेट पाणीपुरवठा – लुईसवाडी, काजुवाडी, हाजूरी गाव, रघुनाथनगर, जिजामाता नगर, साईनाथ नगर.

किसननगर कनेक्शन मार्फत थेट पाणी पुरवठा – किसननगर 1, किसननगर 2, किसननगर 3, शिवाजीनगर, पडवळनगर, डिसोझावाडी.

अंबिकानगर कनेक्शनमार्फत थेट पाणीपुरवठा – अंबिकानगर 2, ज्ञानेश्वरनगर, जयभवानी नगर, राजीव गांधी नगर.

तरी पाणीकपात कालावधीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ML/KA/SL

29 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *