८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन मुंबईत

 ८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन मुंबईत

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास प्रबोधिनी, मुंबई आयोजित ८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन रविवार ०२ एप्रिल रोजी सम्राटकार बबनराव कांबळे साहित्य नगरी, शिवाई विद्यालय भांडुप (पूर्व) येथे संपन्न होत आहे.

या संमेलनाला सुप्रसिध्द साहित्यिका आयु. आशालता कांबळे या संमेलनाध्यक्षा म्हणून लाभलेल्या आहेत. संमेलनाचे उद्घाटन सद्धम्म पत्रिकेचे संस्थापक संपादक प्रा. आनंद देवडेकर करतील, तर विक्रोळी मतदार संघाचे, आमदार सुनिल राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला साहित्यिक, साहित्य प्रेमी व चळवळीतील समस्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड श्रीकृष्ण टोबरे यांनी केले आहे. या संमेलनात प्रा. सिंधुताई रामटेके यांच्या सुंदर कथाकथनाचा आस्वाद घेता येईल.

“नविन शैक्षणिक धोरणाचे दुरगामी परिणाम”, या परिसंवादात सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्रा. विजय मोहिते व बहुजन संघटक या वृत्तपत्राचे संपादक भास्कर सरोदे सहभागी असतील तर शुध्दोदन आहेर अध्यक्षपद भुषवणार आहेत.

भारतीय लोकशाही काल, आज आणि उद्या, या दुसऱ्या परिसंवादात प्रा. सुमेध पारवे, युवा आंबेडकर विचारवंत व संशोधक आणि सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्रा. गोविंद गायकवाड हे आपले विचार मांडतील तर समाज क्रांती आघाडी या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे या परिसंवादाच्या अध्यक्षपदी असतील.

प्रमुख पाहुणे लोककवी व साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत व कविवर्य बबन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न होईल. या संमेलनात राजरत्न राजगुरु, निलाताई वाघमारे, उत्तम भगत, कवि दीप, मिलिंद जाधव, वर्षा भिसे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसूळ, वृषाली माने, हरेश कुलकर्णी इत्यादी कवी सहभागी होणार आहेत. आंबेडकरी साहित्य समिक्षक सुरेश केदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

ML/KA/SL

29 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *