पालिकेच्या सीबीएसई-आयसीएसई शाळांमध्ये ‘अतिरिक्त तुकड्यां’चा निर्णय

 पालिकेच्या सीबीएसई-आयसीएसई शाळांमध्ये ‘अतिरिक्त तुकड्यां’चा निर्णय

मुंबई, दि २८: बृहन्मुंबई महानगरपालिका (पालिका) चालवत असलेल्या सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये वाढत्या प्रवेश मागणीमुळे आता नर्सरी ते दहावीपर्यंत प्रत्येक वर्गात अतिरिक्त तुकड्या सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. प्रत्येक वर्गात चार अतिरिक्त तुकड्या वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच शिक्षण समिती व पालिकेच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. या निर्णयामुळे २०२७-२८ शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांकडे पालकांचा वाढता कल लक्षात घेऊन २०२०-२१ पासून १८ सीबीएसई, १ आयसीएसई, १ आयजीसीएसई आणि १ आयबी अशा एकूण २१ शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांना पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मर्यादित तुकड्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी नगरसेवक आणि पालकांकडून सातत्याने येत होत्या. त्यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या संधी वाढणार असून पालकांमधील तणावही कमी होण्याची शक्यता आहे.

………….
प्रवेश पद्धत कशी?
पालिकेच्या पब्लिक स्कूलमध्ये ८५ टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने दिला जातो. १० टक्के प्रवेश महापौरांच्या शिफारशीवर, तर ५ टक्के प्रवेश पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव असतो.
……….
सुविधा व खर्च
प्रत्येक अतिरिक्त तुकडीत जास्तीत जास्त ४० विद्यार्थी असतील. त्यानुसार आवश्यक वर्गखोल्या, पाठ्यपुस्तके, ग्रंथालय साहित्य व इतर शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठीचा खर्च पालिकेच्या अर्थसंकल्पातून केला जाईल.
………..
या शाळांमध्ये वाढणार अतिरिक्त तुकड्या
मुंबई पब्लिक स्कूल पुनम नगर, वूलन मिल (आयसीएसई), चिकूवाडी, जनकल्याण नगर, प्रतिक्षानगर, मिठानगर, हरियाली व्हिलेज, राजावाडी, अजीजबाग, तुंगा व्हिलेज, भवानी शंकर रोड, काणे नगर, आणिक व्हिलेज, आशिष तलाव, एम.जी. क्रॉस रोड, मालवणी टाऊनशीप, शांतीनगर, वीर सावरकर आणि नटवर पारेख कंपाऊंड येथील शाळांचा यात समावेश आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *