भारताचा जगातील सर्वात असमान देशांमध्ये समावेश

 भारताचा जगातील सर्वात असमान देशांमध्ये समावेश

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘जागतिक असमानता अहवाल 2022’ नुसार, (World Inequality Report) भारत हा जगातील सर्वात असमान देशांपैकी एक आहे, ज्याठिकाणी एकीकडे दारिद्र्य वाढत आहे आणि दुसरीकडे समृद्ध उच्चभ्रू वर्गाचा स्तर आणखी वाढत आहे. अहवालानुसार, भारतातील अव्वल 10 टक्के श्रीमंत लोकांचे उत्पन्न भारताच्या एकूण उत्पन्नाच्या 57 टक्के आहे, तर अव्वल 1 टक्के श्रीमंत लोकांचा देशाच्या एकूण उत्पन्नात 22 टक्के वाटा आहे. याउलट, तळातील 50 टक्के लोकांच्या एकूण उत्पन्नाचे योगदान कमी होऊन केवळ 13 टक्क्यांवर आले आहे.

 

जागतिक असमानता अहवालातील (World Inequality Report) आकडेवारी सादर करताना देशातील प्रौढ लोकसंख्येचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न वार्षिक 2 लाख 4 हजार 200 रुपये असल्याचे सांगण्यात आले. यातील तळातील 50 टक्के लोक 53,610 रुपये कमावतात, तर अव्वल 10 टक्के प्रौढ सरासरी 11,66,520 रुपये कमावतात. हा आकडा तळाच्या 50 टक्के प्रौढांच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जवळपास 20 पट जास्त आहे. अहवालानुसार, भारतातील सरासरी घरगुती मालमत्ता सुमारे 9,83,010 रुपये आहे. हा अहवाल लुकास चॅन्सेल यांनी लिहिला आहे आणि प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी, इमॅन्युएल सेज आणि गॅब्रिएल झुकमन यांनी एकत्रित केला आहे.

 

According to the World Inequality Report 2022, India is one of the most unequal countries in the world, with rising poverty and rising affluent elites. According to the report, the top 10 per cent of India’s richest people account for 57 per cent of India’s gross domestic product, while the top 1 per cent of the rich make up 22 per cent of the country’s gross domestic product.

 

PL/KA/PL/08 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *