वाढत्या कर्जामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात

 वाढत्या कर्जामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या बातमीमुळे जगातील वित्तीय बाजारामध्ये चिंता निर्माण झाली आहे की 2020 मध्ये जगाचे कर्ज (Loan) जीडीपी (GDP) प्रमाण 356 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 2019 च्या तुलनेत हे 35 टक्के जास्त आहे. कर्जाचे हे प्रमाण म्हणजे जगात गेल्या वर्षी जेवढे सकल उत्पादन झाले त्याच्या मुल्याच्या 356 पट जास्त कर्ज होते. तज्ञांच्या मते, 2020 मध्ये या प्रकरणात इतकी वाढ कोरोना (Corona) साथीमुळे बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये (Economy) घसरण झाल्यामुळे झाली, तर बहुतांश सर्वच देशांनी जास्त कर्ज घेऊन साथीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला.
अर्थशास्त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे की भूतकाळात जेव्हा कधीही कर्जाचे प्रमाण जीडीपीच्या (GDP) तुलनेत एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले तेव्हा त्याचे हानिकारक परिणाम समोर आले आहेत. जागतिक बँकेने (World Bank) गेल्या वर्षी केलेल्या एका अभ्यासानुसार हे निदर्शनास आणून दिले होते की 1970 पासून कर्जाची वाढ झाल्यामुळे आर्थिक पेचप्रसंगाची स्थिती उद्भवली आहे. या अभ्यासानुसार 1970 नंतर कर्जाची चौथी लाट 2010 मध्ये सुरू झाली. या काळात वाढलेले कर्जाचे प्रमाण कोरोना (Corona) साथ सुरु होण्यापूर्वीपासून चिंतेची बाब बनली होती. तज्ञांनी म्हटले आहे की लस सुरू आल्यामुळे यावर्षी जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) सुधारणा होईल, परंतु त्याचा कर्जाच्या प्रमाणावर किती फरक होईल हे सांगणे सध्यातरी कठीण आहे.
आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेच्या (IIF) मते 2020 मध्ये जागतिक कर्ज 281 ट्रिलियन डॉलरवर पोचले. 61 देशांमध्ये सरकारी आणि खासगी कर्जात 25 ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. गेल्या एका दशकात या देशांनी 88 ट्रिलियन डॉलरचे कर्ज घेतले आहे. 2020 मध्ये एकूण सरकारी कर्ज जागतिक जीडीपीच्या (GDP) 105 टक्क्यांपर्यंत पोहोचले. 2019 मध्ये ते 88 टक्के होते. 2020 मध्ये हे कर्ज 12 ट्रिलियन डॉलरने वाढले, तर 2019 मध्ये ही वाढ 4.3 ट्रिलियन डॉलर होती. वित्तीय क्षेत्राच्या कर्जात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. 2016 नंतर प्रथमच या क्षेत्रावर कर्ज वाढले आहे. या आकडेवारीवरून दिसून येते की कोरोना (Corona) साथीने जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थांचे कंबरडे मोडले आहे.
अर्थशास्त्रज्ञांनी पूर्वीच्या अभ्यासात असे म्हटले आहे की जर एखाद्या देशात जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण 72 टक्क्यांपेक्षा जास्त होत असेल तर त्याचा थेट परिणाम आर्थिक विकासाच्या दरावर होतो. त्याच वेळी, यामुळे महागाई वाढण्याची आणि कर्जावरील व्याज दर वाढण्याची शक्यता निर्माण होते. आता जर कर्जाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे तर अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की त्याचा परिणाम साथीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर होईल. आणखी एक समस्या अशी आहे की 2020 मध्ये घेतलेले जवळजवळ सर्व कर्ज तत्काळ गरजांसाठी घेतले गेले होते. त्यांची भविष्यातील विकास योजनांमध्ये गुंतवणूकी झालेली नाही. आता विविध देशांची कर्ज घेण्याची क्षमता कमी झाली असल्याने त्याचा भविष्यातील विकासावर खूपच वाईट परिणाम होऊ शकतो.
 
PL/KA/PL/20 FEB 2021

mmc

Related post