घरातून काम करणार्‍यांना मिळणार खर्चावर वजावट?

 घरातून काम करणार्‍यांना मिळणार खर्चावर वजावट?

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील करदात्यांना यावेळी 2022 च्या अर्थसंकल्पाकडून (Budget) मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्र्यांकडूनही, त्या आपल्या अर्थसंकल्पात करदात्यांना निराश करणार नाही, अशी अपेक्षा आहे. विशेष करुन कोविड साथीमध्ये, अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी करदात्यांना दिलासा देणे खूप महत्वाचे आहे. अशी चर्चा आहे की यावेळी नोकरदार व्यक्तींना मोठा फायदा मिळू शकतो, विशेषत: जे लोक घरून काम करण्याच्या (Work from home) स्थितीत आहेत.

घरातून काम करत (Work from home) असल्यामुळे नोकरदार व्यक्तींचा खर्च खूपच वाढला आहे. इंटरनेट-ब्रॉडबँड, टेलिफोन, फर्निचर आणि वीज यांची बिले पूर्वीपेक्षा जास्त येत आहेत. यापूर्वी कार्यालयीन पायाभूत सुविधांमध्ये हा सर्व खर्च वाचत असे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात (Budget) पगारदार व्यक्तीला सरकारकडून घरातून काम करण्याचा भत्ता भेट म्हणून मिळू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

कर सेवा आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी डेलॉइट इंडियाची मागणी आहे की कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा (Work from home) भत्ता दिला गेला पाहिजे. सरकार थेट भत्ता देऊ शकत नसेल, तर करात सूट देण्याची तरतूद करायला हवी. डेलॉइटने ब्रिटनमधील घरातून काम करण्याच्या संस्कृतीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना करात सवलत देण्यासाठी सरकारने विशेष नियम केले आहेत. भारतात अशा प्रकारे नोकरी करणाऱ्यांना सूट दिली जाऊ शकते. डेलॉइट इंडियाने सल्ला दिला आहे की जे कर्मचारी त्यांच्या घरून काम करत आहेत त्यांना 50,000 रुपयांपर्यंत घरून काम करण्याबद्दलची वजावट देण्यात यावी.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) देखील आपल्या शिफारसींमध्ये अशीच मागणी केली आहे. त्यांनी शिफारस केली आहे की सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पात (Budget) घरुन काम करण्याच्या खर्चावर कर सवलत द्यावी. फर्निचर किंवा घरातील ऑफिस सेटअपवरील खर्चावर कर सूट दिली पाहिजे. कारण, कर्मचार्‍याने कार्यालयीन कामासाठी टेबल, खुर्ची किंवा इतर वस्तू खरेदी केल्या तर कार्यालयीन काम करत असूनही त्या खर्चावर कर्मचार्‍याला कर भरावा लागतो.

करदात्यांनाही मानक वजावटीमध्येही सवलत द्यावी, अशी आयसीएआयची मागणी आहे. त्याची मर्यादा वाढवण्याची गरज आहे. सध्या, आयकरांतर्गत मानक वजावट मर्यादा 50,000 रुपये आहे. ती वाढवून एक लाख रुपये करावी. मानक वजावटीची मागणी अशा खर्चावर आहे जो कार्यालयीन कामासाठी होत आहे आणि व्यावसायिक कराच्या व्यतिरिक्त आहे.

The country’s taxpayers have high expectations from the 2022 budget this time. Relieving taxpayers is especially important in reviving the economy, especially in the Covidian community. There is talk that this could be of great benefit to employed individuals, especially those who are in a position to work from home.

PL/KA/PL/12 JAN 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *