महिला रस्त्यावर करतेय जादूटोणा?

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियावर दररोज शेकडो-हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. याच पार्श्वभूमीवर एक अतरंगी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता. ही महिला रस्त्याच्या मधोमध बसून काहीतरी पूजा वगैरे करताना दिसतेय. तिनं आपल्या भोवताली आग पेटवलीये आणि पिशवीतून काहीतरी काढून ती विधी वगैरे करतेय असं वाटतेय. हा व्हिडीओ व्हायरल होत असून काही नेटकरी यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतेय की, भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवावं म्हणून ती काळी जादू करतेय, तर कोणी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी पूजा सुरू असल्याचा दावा करतेय.
या महिलेला आपण फेरीवाले देखील म्हणू शकत नाही कारण फेरीवाले रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवर बसून वस्तू विक्रीचं काम करतात. बरं, गाड्या ज्या मार्गानं जातायेत ते पाहाता ती चार रस्त्यांच्या मध्ये बसलेली दिसतेय. त्यामुळे ती नक्की काय करतेय? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. असो, तुम्हाला काय वाटतं खरच ती काहीतरी पूजा वगैरे करत असेल का? की आणखी काही सुरू आहे? Women doing witchcraft on the street?
ML/ML/PGB
24 Jun 2024