राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा 

 राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा 

नाशिक, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यावर टीका करीत राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली तर ऊस उत्पादकांसाठी उद्या पुणे येथे साखर आयुक्त कार्यालय मोर्चा काढण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्या या सरकारच्या दावणीला बांधल्या असून यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मागील वर्षी झालेला बे मोसमी पाऊस आणि यावर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी संपूर्णपणे संकटात सापडला आहे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे राजू शेट्टी raju shetty  यांनी मनमाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ML/KA/PGB

6 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *