लघू उद्योग प्रशिक्षण केंद्र लवकरच

 लघू उद्योग प्रशिक्षण केंद्र लवकरच

सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हात केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे , लवकरच त्याची कारवाई पूर्ण होईल अशी माहिती या खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि एम एस एम इ खाते एकत्र येऊन जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करतील असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पडवे येथील आयोजित पत्रकार परिषदेत केले .

कोकणात येऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प ठरलेल्या जागीच होईल आणि त्यासंबंधी घोषणा लवकरच पेट्रोलियम मंत्री करतील अशी माहिती सुदधा राणे यांनी यावेळी दिली .

नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज यशस्वी बाय पास सर्जरी करण्यात आली , याबद्दल त्यांनी सर्व डॉक्टरांचे अभिनंदन केले .

SL/KA/SL

6 Nov.2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *