विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका..

 विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका..

नागपुर/अमरावती , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे,मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या काही रुग्ण असलेल्या वार्ड मध्ये पाणी शिरलं त्यामुळे रुग्णांची एकच तारांबळ उडाली. दुसरीकडे अमरावती शहरातील राजापेठ ते दस्तूरनगर मार्गावर सात ते आठ वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. काही ठिकानी विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत.त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे, शहराच्या बहुतेक रस्त्यावर झाडे पडलेली आहेत. रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही ग्रामीण भागात पाऊस सुरूच आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे पुन्हा नुकसान झालं आहे.*नागपूरात पहाटेपासून पाऊस*नागपुरात आज पहाटे 5 वाजल्यापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. मधल्या वेळेत विश्रांती दिल्यानंतर जिल्हयात पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसामुळे शहरातील काही भागात झाडे सुध्दा उन्मळून पडलेली आहेत. भर उन्हाळ्यात पावसाळा सुरू असल्याचे जाणवत आहे. सकाळ पासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे.

ML/KA/PGB 30 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *