विदर्भातील पहिले धूर आणि प्रदूषणमुक्त कम्युनिटी किचन

 विदर्भातील पहिले धूर आणि प्रदूषणमुक्त कम्युनिटी किचन

अकोला, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्हयातील डे बोर्डिंग शाळा असणाऱ्या प्रभात स्कूलमध्ये दररोज एक हजार आठशे विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या स्वयंपाकासाठी धूर आणि प्रदूषणमुक्त कम्युनिटी किचनचा विदर्भातील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे प्रभात स्कूल हे विदर्भातील पहिले धुरमुक्त प्रदूषणमुक्त कम्युनिटी किचन ठरले आहे.

पातूर रोडवरील प्रभात शाळेतील एक हजार आठशे विद्यार्थ्यासाठी दररोज जेवण आणि नाश्ता तयार केला जाते.यावेळी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. प्रभातमधील कम्युनिटी किचनमध्ये स्वयंपाक तयार करताना कुठलाही गॅस किंवा लाकूड वापरण्याची गरज पडत नाही.याऐवजी विशिष्ट प्रकारच्या अत्याधुनिक प्रणालीद्वारे ऑइल गरम करून ते थेट स्वयंपाकासाठी वापरले जाते.ज्यामुळे धूर आणि प्रदूषणसुद्धा होत नाही.

फ्लेमलेस प्रणालीद्वारे स्वयंपाक तयार करताना एका विशिष्ट तापमानात तो तयार होत असल्यामुळे त्यातील जीवनसत्वे अबाधित राहतात आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास हातभार लागतो अशी माहिती प्रभात स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी दिली.

यापूर्वी दररोज अठराशे विद्यार्थ्यांचे जेवण तयार करण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केल्या जायचा तर कधी लाकडांचा वापर करून जेवण तयार केलें जायचे यामुळे प्रदूषण तर व्हायचेच शिवाय सिलेंडर मिळायला येणाऱ्या अडचणी आणि खर्चही अधिक व्हायचा.त्यामुळे शाळेला प्रदूषणमुक्त कम्युनिटी किचनची संकल्पना 2008 मध्ये सुचली आणि साकार झाली त्यापासून आजपर्यंत ती अव्याहतपणे कार्यरत आहे.

सुरक्षित अन्न प्रक्रिया

फूड ग्रेंट ल्युब्रीकंट ऑईल बॉयलरद्वारे गरम करुन कॉम्प्रेसरद्वारे स्वयंपाकघरातील कढईपर्यंत पोहचवले जाते.यामुळे कढई गरम होऊन कुठलाही धूर किंवा प्रदूषणाशिवाय मुलांचे जेवण तयार केले जाते.शिवाय अत्यंत सुरक्षित ही प्रक्रिया होत असल्याने स्वयंपाक घरातील कामगार पुर्णपणे सुरक्षित राहतात.
पर्यावरणपूरक,सुरक्षित आणि धूरमुक्त कम्युनिटी किचनचा हा प्रयोग यशस्वी झाला असून असून यामुळे वेळ व पैशांची बचत होते.
शिवाय कुठल्याही विद्युतप्रवाहा शिवाय फ्लेमलेस किचन ही संकल्पना कार्यरत असल्याने ती अत्यंत सुरक्षित आहे.

तंत्रज्ञानाचा उत्तम वापर, वेळ , खर्चाची बचत आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे धूरमुक्त कम्युनिटी किचनचा हा प्रयोग एकाचवेळी हजारो लोकांसाठी स्वयंपाक करणाऱ्या सामजिक संस्था,प्रतिष्ठान, धार्मिकस्थळे, वस्तीगृह आणि डे बोर्डिंग शाळेसाठी महत्वपूर्ण पर्याय होऊ शकेल हे निश्चित… Vidarbha’s first smoke and pollution free community kitchen

ML/KA/PGB
17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *