रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन

 रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर विभागनिहाय  कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून येत्या सोमवार 21 ऑगस्ट रोजी मुंबई प्रदेश चे कार्यकर्ता प्रशिक्षण  शिबीर बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.मुंबई प्रदेशच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरापासून राज्यभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात पाहिले शिबीर 21 ऑगस्ट मुंबई तर दुसरे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर विदर्भ विभागाचे यवतमाळ येथे होत आहे. तर 27 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. 28 ऑगस्ट रोजी ठाणे प्रदेश चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर भिवंडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
मराठवाडा विभागाचे प्रशिक्षण शिबीर 30 ऑगस्ट रोजी जालना येथे तर 31 ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.तसेच कोकण विभागाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर चिपळूण येथे 3 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.तसेच 4 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बोईसर येथे आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.Organization of State-Wise Worker Training Camps of the Republican Party

ML/KA/PGB
17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *