चांद्रयान ३ मोहिमेमध्ये विदर्भाचा खारीचा वाटा

 चांद्रयान ३ मोहिमेमध्ये विदर्भाचा खारीचा वाटा

बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान ३ ने आज अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडींग केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अखिल देशवासियांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या या मोहिमेत बुलडाणा जिल्हयातील खामगाव एमआयडीसीतील विकमशी फॅब्रिक्स प्रा. लि. मध्ये निर्माण झालेल्या थर्मल शिल्डचा वापर चांद्रयानमध्ये करण्यात आला आहे. विकमशी फॅब्रिक्सने याआधीसुद्धा मिग २१ फायटर प्लेनसाठी ताडपत्री तयार केली होती. अशारितिने या जगप्रसिद्ध मोहिमेमध्ये खारीचा वाटा उचलणे ही बुलडाणा जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.विकमशी फॅब्रिक्सने भारतीय संरक्षण विभागाला पुरवून देशकार्यात सहभाग नोंदवल्या बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

या कामगिरी बद्दल बोलताना विकमशी फॅब्रिक्सच्या गितिका विकमशी म्हणाल्या, ” भारतीय संरक्षण क्षेत्रात लागणा-या विविध उत्पादन पुरवठयाच्या माध्यमातन इसरोच्या कामगिरीत आम्ही खारीचा वाटा उचलला याचे समाधान आहे. आता चांद्रयान ३ मध्ये आमच्या कंपनीत निर्मित थर्मल शिल्ड प्रोडेक्टचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी चांद्रयान ०१ व ०२ मध्येही आमच्या येथे बनवण्यात आलेल्या थर्मल शिल्डचा वापर करण्यात आला होता. देशाच्या स्वप्नपूर्तीत विकमशी परिवाराचे योगदान राहिले याचे समाधान आहे.”

१९८७ मध्ये सुद्धा मिग विमानासाठी ताडपत्रीचे उत्पादन करून तर १९९० मध्ये सर्जीकल आणि रबरशिटच्या उत्पादनाच्या माध्यमातून विकमशी उद्योग समूहाने योगदान दिले होते.त्याचवेळी अग्निबाणाच्या उष्णतेपासून उपग्रह सुरक्षित ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ फॅब्रिकचीही निर्मिती यापूर्वी केली होती. याशिवाय जीएसएलव्ही मार्क 03 अग्नीबाणाच्या सहाय्याने ३.१३ टन वजनाच्या जी सट १९ उपग्रहासाठी पातळ फॅब्रिक्स तयार करण्यात आले होते. एकंदरीत विकमशी उद्योग समूहाने वेळोवेळी आपले योगदान दिले आहे.

SL/KA/SL

23 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *