हे आहे चांद्रयान-३ च्या लँडीगसाठी आजचा दिवस निवडण्याचे महत्त्व

 हे आहे चांद्रयान-३ च्या लँडीगसाठी आजचा दिवस निवडण्याचे महत्त्व

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोच्या चांद्रयान-३ चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करणारा आजचा दिवस म्हणजेच २३ ऑगस्ट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे. कोट्यवधी भारतीयांनी आज चांद्रयानाचे यशस्वी लँडींग एखाद्या सणाप्रमाणेच साजरा केले आहे. निर्धारित वेळेत चांद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडल्याचे टिव्ही स्क्रिनवर पाहणे हा रोमहर्षक क्षण आज भारतीयांनी अनुभवला. भारत आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे. या साऱ्या जल्लोशपूर्ण वातावरणात चांद्रयान-३ च्या लँडिंगसाठी २३ तारीखच का निवडण्यात आली? यामागचे कारण जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

२३ ऑगस्ट ही तारीख निवडण्याचे कारण
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चांद्रयान-३ मधील लँडर व रोव्हर सूर्यप्रकाशाचा वापर करतील; जे त्यांच्या इक्विपमेंट्सना चार्ज राहण्यासाठी आवश्यक आहे. चंद्रावर १४ दिवस सूर्यप्रकाश आणि पुढील १४ दिवस काळोख अर्थात रात्र असते; यात दिवसा खूप उष्णता आणि रात्री खूप थंड वातावरण असते. दक्षिण ध्रुवावर तापमान उणे २३० अंशांवर जाते. त्यामुळे चांद्रयान अशा वेळी चंद्रावर उतरेल, जेव्हा १४ दिवस सूर्यप्रकाश असेल.

इस्रोने लँडर आणि रोव्हरसाठी २३ ऑगस्टचा दिवस निवडला आहे. कारण- चंद्रावरील १४ दिवसांचा रात्रीचा कालावधी २२ ऑगस्ट रोजी संपत आहे आणि २३ ऑगस्टपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश असणार आहे. आजपासून म्हणजेच २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश असेल; ज्याच्या मदतीने चांद्रयानाचे रोव्हर चार्ज होत राहील आणि ते आपले मिशन यशस्वीपणे पूर्ण करू शकेल. आजपासून पुढील १४ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर राहून प्रज्ञान रोव्हर चंद्राबाबतची महत्त्वपूर्ण माहिती संकलित करणार आहे.

SL/KA/SL

23 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *