६ आणि ७ जानेवारी रोजी पुण्यात ‘विचारवेध संमेलन ‘
पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने ६ आणि ७ जानेवारी रोजी विचारवेध संमेलन – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हे संमेलन होणार आहे.’ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच विचारवंत सहभागी होणार आहेत.
पुणे श्रमिक पत्रकार संघ झालेल्या पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वतीने आनंद करंदीकर, सरिता आवाड, राजाभाऊ गायकवाड यांनी ही माहिती दिली.
यावर्षी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पुरेशा माहितीवर आधारित, विचारपूर्वक आणि निर्भय मतदान करता येणे ,हे लोकशाहीच्या बळकटी
करणासाठी आवश्यक आहे. लोकशाही रक्षणाच्या तातडीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी हे विचारवेध संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
योगेंद्र यादव, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ.कुमार सप्तर्षी, निरंजन टकले, हरीष सदानी, सुनीती सु.र., अजित रानडे, संदीप बर्वे आणि अन्य मान्यवर दोन दिवस विविध सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
दोन दिवस विचार परामर्श,मुक्त संवाद, प्रश्नोत्तरे
शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता योगेंद्र यादव यांच्या ‘लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया’ भाषणाने संमेलनाचा प्रारंभ होईल. आनंद करंदीकर विचारवेध संमेलनामागची भूमिका स्पष्ट करतील. साडेअकरा वाजता ‘लोकशाही खच्चीकरणाचे जागतिक प्रयत्न’ या विषयावर अरविंद वैद्य यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता सुनीती सु.र.यांचे ‘लोकशाही रक्षणासाठी लोकांचे धडे’ या विषयावर व्याख्यान होईल. पावणे दोन वाजता ‘माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही’ विषयावर अलका धुपकर संवाद साधतील. राही श्रुती गणेश या ‘शिक्षण संस्थांना फॅसिस्टांची मगरमिठी ‘ विषयावर माहिती देतील. साडे तीन वाजता ‘मुस्लिम मागासवर्गीय आणि लोकशाही रक्षण ‘या विषयावर तमन्ना इनामदार बोलणार आहेत.
४ वाजता Adv. प्रियदर्शी तेलंग हे ‘लोकशाहीसाठी दलित संघटन’ विषयावर व्याख्यान देतील. पावणे पाच वाजता वसुधा सरदार या ‘दारूममुक्तीसाठी चळवळ उभारणी’ या विषयावर तर प्रभात सिन्हा हे ‘माणदेशी चॅम्पियन्स’ विषयावर माहिती देतील. सव्वा सहा वाजता ‘हू किल्ड गांधी’ माहितीपट दाखविला जाईल आणि तुषार गांधी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.
रविवार, ७ जानेवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सव्वादहा वाजता समुहगीतांनी प्रारंभ होईल. साडेदहा वाजता ‘सद्भावना मिशन’ या विषयावर डॉ.राम पुनियानी मार्गदर्शन करतील. ‘लोकशाही रक्षण’ या विषयावर निरंजन टकले यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता ‘स्त्रीवादाच्या संदर्भांत लैंगिक हक्क संरक्षण’ या विषयावर हरीश सदानी हे संवाद साधतील. पाऊण वाजता ‘संविधान प्रचार चळवळीचा अनुभव’ विषयाची माहिती संदीप बर्वे देतील. दुपारी सव्वा दोन वाजता ‘स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला प्रतिनिधींचे सक्षमीकरण’ या विषयावर भीम रासकर माहिती देतील.
पावणे तीन वाजता याच विषयवार नीती दिवाण हिंदीतून माहिती देतील. सायंकाळी ४ वाजता ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा’ या विषयावर अजित रानडे यांचे व्याख्यान होईल. सव्वा पाच वाजता ‘लोकशाही रक्षणाच्या लढ्याची दिशा’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी मार्गदर्शन करतील. सहा वाजता सरिता आवाड संमेलनाचा समारोप करतील. ‘Vicharvedh Samelan’ in Pune on 6th and 7th January
ML/KA/PGB
3 Jan 2024