मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना अभिवादन केले.
ML/KA/SL
3 Jan. 2023