बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार : वर्षा गायकवाड

 बेस्टच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार : वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला वाहकांची स्थिती खूप बिकट आहे. त्यांना प्रशासनाकडून मदतीची गरज आहेच. त्यांच्या या सर्व समस्या आम्ही मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून बेस्टच्या महाव्यवस्थापकांपर्यंत पोहोचवू. पण त्याचसोबत मुंबईकरांनाही आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या या महिला वाहकांच्या कार्याचा योग्य आदर करणं गरजेचं आहे,

यावेळी महिला वाहकांनीही मनमोकळेपणे आपल्या वर्षा गायकवाड यांच्या कानांवर घातल्या. लवकरच मुंबई काँग्रेस या सर्व प्रश्नांना वाचा फोडेल, अशी ग्वाही देखील वर्षा गायकवाड यांनी दिली. महिलांच्या कर्तृत्त्वाला आणि त्यांच्या कष्टांना वंदन करण्यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड विविध क्षेत्रांमधील महिलांच्या भेटी घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून त्या धारावी आगारातील महिला वाहकांच्या भेटीला गेल्या. या भेटीदरम्यान त्यांनी पुष्पगुच्छ देत या महिलांचा, त्यांच्या कष्टाचा आणि कर्तृत्त्वाचा सन्मान केला. या वेळी आगार व्यवस्थापक फ्रान्सिस आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

खराब स्वच्छतागृह, विश्रांती कक्षांचा अभाव, प्रवाशांकडून मिळणारी अरेरावीची वागणूक अशा अनेक आव्हानांशी झुंजत या महिला मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत असतात. त्यांच्या कार्याला मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे सलाम करण्यासाठी मी इथे आली आहे, असे सांगत मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी धारावी आगारातील महिला वाहकांसोबत संवाद साधला.

ML/KA/PGB
20 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *