युपीआय व्यवहार चार वर्षात 70 टक्क्यांनी वाढले

 युपीआय व्यवहार चार वर्षात 70 टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) काळात निर्बंध वाढत गेल्यामुळे ऑनलाइन खरेदीत (Online purchase) वाढ होत गेली. रोख व्यवहाराचा पर्याय आता भूतकाळातील गोष्ट वाटू लागली आहे. अलीकडेच, एका अहवालात असे समोर आले होते की क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या सतत वाढत आहे आणि यामुळे ऑक्टोबर महिन्यात खरेदीदारांचा आकडा एक लाख कोटींच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, आणखी एका अहवालानुसार, युपीआय वरून होणारे व्यवहार (UPI Transactions) देखील दरवर्षी वाढत आहेत. त्यात म्हटले आहे की, अवघ्या चार वर्षांत युपीआय व्यवहारांमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

या अहवालात असे समोर आले आहे की, कीकडे या चार वर्षांत युपीआय व्यवहारात (UPI Transactions) मोठी वाढ झाली असतानाच याच काळात डेबिट कार्ड व्यवहारात घट झाली आहे. अहवालानुसार, नोव्हेंबरमधील युपीआय व्यवहार मात्र ऑक्टोबरच्या तुलनेत किंचित कमी होते. ऑक्टोबरमध्ये ते विक्रमी पातळीवर पोहोचले होता. अहवालानुसार, सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीला उधाण आले होते. या कालावधीत, 41 टक्के ग्राहकांनी डिजिटल पेमेंट केले, 26 टक्के ग्राहकांनी रोख पैसे दिले, तर 23 टक्के ग्राहकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहाराचा पर्याय निवडला.

 

नोव्हेंबर महिन्यात एकूण 418 कोटी युपीआय व्यवहार (UPI Transactions) झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. एकूण व्यवहार मूल्य 7.68 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरमध्ये दररोज यूपीआयद्वारे 13 कोटी व्यवहार झाले. विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये एकूण युपीआय व्यवहारांची एकूण संख्या 421 कोटी होती.

 

Recently, a report found that the number of credit card users has been steadily rising, pushing the number of buyers to over one trillion in October. At the same time, according to another report, UPI transactions are also increasing every year. In just four years, UPI transactions have grown by 70 per cent, it said.

PL/KA/PL/07 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *