‘आई कुठे काय करते’ मधली अरुंधती गायब झाल्याचे हे आहे कारण
दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची मुख्य भूमिका असणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर करते. कायमच सोशल मीडियावर सक्रीय असणारी लाडकी अरुंधती सातत्याने चर्चेत असते. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. त्यापैकीच एक म्हणजे या मालिकेतून अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर गायब असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तिने ही मालिका सोडल्याचेही बोललं जात आहे. मात्र तिने यावर मौन सोडले आहे.
मधुराणी प्रभुलकर हिला ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी मधुराणी प्रभुलकर हिने आठवड्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, यात तिने मालिकेत तिच्या अनुपस्थित असण्यामागचे कारण सांगितले होते.
या पोस्टमध्ये तिने मालिकेत न झळकण्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. “माझी एक छोटी सर्जरी झाली असल्या कारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन, असे तिने यात म्हटले होते. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरलही झाली होती.”
दरम्यान ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे. या मालिकेत एकीकडे विशाखाचा पती केदार हा दारुच्या व्यसनातून बाहेर आल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे यश आणि गौरी यांच्या दोघात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. गौरीने परदेशात नोकरी करण्याचा घेतलेला निर्णय यशला अजिबात पटलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होताना दिसत आहे. त्यामुळे या मालिकेतील रंगत चांगलीच वाढत जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
TM/KA/SL
4 Nov. 2022