आंतरराज्य समन्वय बैठकीत सीमा प्रश्नावर चर्चाच नाही

 आंतरराज्य समन्वय बैठकीत सीमा प्रश्नावर चर्चाच नाही

कोल्हापूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांची आज बैठक होत झाली मात्र त्यात सीमा प्रश्न सोडून इतर विषय चर्चिले गेले आहेत. No discussion on the border issue in the Maharashtra- Karnatak inter-state coordination meeting.

कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब या समन्वय बैठक स्थळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि कर्नाटक चे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यात ही चर्चा झाली.

अलमट्टी धरणाच्या उंची सह सीमावर्ती जिल्ह्यात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील पाच तर कर्नाटकातील चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तीन विभागीय आयुक्त या बैठकीत सहभागी झाले होते.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर करणाऱ्या अलमट्टी धरणाचा पाणीसाठा नियंत्रण आणि संभाव्य उंची वाढवण्याच्या मुद्द्यावर यात चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर यात चर्चा झाली.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर , उस्मानाबाद, आणि लातूर या महाराष्ट्रातील तर बेळगाव, विजयपुरा, कलबुर्गी आणि बिदर या कर्नाटकातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यांचे प्रश्न चर्चिले गेले.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प हत्तींचा उपद्रव सीमाभागात पशुखाद्य उपलब्धता, कोरोना ने कर्नाटकात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणारे अनुदान, तसेच विद्यार्थी दाखले आदी प्रश्न यात होते.

ML/KA/SL

4 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *