सहा महिन्यांत हटणार देशभरातील टोल नाके

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील दळणवळण अधिक सुखकर आणि अत्याधुनिक व्हावे यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या सहा महिन्यांत देशातील टोल नाके हटवून GPS प्रणाली बसवण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्याच आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
टोल वसुली नाक्यांवर होणाऱ्या ट्रॅफीक जॅममुळे वेळ,इंधन यांची बचत करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. गाडी न थांबवता टोल वसुली करण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा वापरण्याची चाचणी सुरू आहे.
भारतीय उद्योग संघटना कॉन्फेड्रेशन ऑफ इंडस्ट्री च्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही माहिती दिली. सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सध्या ४० हजार कोटी रु. चा टोल महसूल जमा होतो. येत्या दोन ते तीन वर्षांत तो वाढून १.४० लाख कोटी रु. होईल असेही गडकरी यांनी सांगितले.
SL/KA/SL
25 March 2023