उद्या मुंबई गोवा मार्ग काँक्रीटीकरण प्रारंभ गडकरींच्या हस्ते

 उद्या मुंबई गोवा मार्ग काँक्रीटीकरण प्रारंभ गडकरींच्या हस्ते

अलिबाग,दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू यांच्यासह आणखी दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण शुभारंभ होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्याही काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल येथे उद्या 30 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे.

या भूमीपूजन सोहळा कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य , विधानसभा सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे.

ML/KA/SL
29 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *