सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या…

 सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या…

नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक शहरातील सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी खासगी सावकारीच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली आहे.

ही खळबळजनक घटना उघडकीस आली त्यावेळी पोलिसांना सुसाइड नोट आढळली असून, त्यात खासगी सावकारांकडून वसुलीचा तगादा मागे लागल्याने सामूहिक आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. वडील दीपक सुपडू शिरुडे ( वय ५५), मोठा मुलगा प्रसाद दीपक शिरुडे (वय २५), राकेश दीपक शिरुडे (वय २३) अशी आत्महत्या करणाऱ्या तिघांची नावे आहेत.Tired of being harassed by moneylenders, three of the same family committed suicide…

नाशिक शहरातील सातपूरच्या अशोकनगर येथील बोलकर व्हॅली पोलीस चौकीजवळ धनदाई निवासात शिरुडे कुटुंबिय राहतात. दीपक शिरुडे यांचा अशोकनगर स्टॉपजवळ फळविक्रीचा व्यवसाय असून, रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तिघांनी घरातील वेगवेगवेगळ्या तीन खोल्यांत पंख्याच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. दीपक याची पत्नी आणि आई या दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या घरी आल्यावर तिघांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, झोन दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर व अंमलदार दाखल झाले.

घरातील रजिस्टरमध्ये सुसाइड नोट आढळली असून, त्यात खासगी सावकारीचा तगादा मागे लागल्याने आत्महत्या करत असल्याचे मृतांनी नमूद केले आहे. सुसाइड नोट, कुटुंबातील माहितीनुसार संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल.

कोणीही खासगी सावकारीने त्रस्त असलेल्या नागरिकांनी पोलीस आयुक्तालयात येऊन तक्रार नोंदवावी. सावकारांवर कायदेशीर कारवाई करू असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

ML/KA/PGB
30 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *