परळी ते लातूर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

 परळी ते लातूर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

बीड, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मध्य रेल्वे विभागातील शेवटचे परंतू उत्पन्नाच्या बाबतीत परळी जंक्शन आघाडीवर असून परळी ते लातूररोड या 63.75 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे, पी.डी. मिश्रा यांनी या नवीन विद्युतीकरण केलेल्या लातूर रोड – परळी वैजनाथ (63.75 मार्ग किलोमीटर) विभागाची पाहणी नुकतीच केली आहे.

रेल्वे विभागाचा प्रति किलोमीटर ५ लिटर हा डिझेलवर होणारा खर्च विद्युतीकरणामुळे निम्म्यावर येणार आहे . देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी हे एक ज्योतिलिंग असून या ठिकाणी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र असल्याने सिकंदराबाद झोन मधील परळी हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे . परळी येथील प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक शहरात येत असल्याने भविष्यात हे स्थानक मध्यवर्ती स्थानक म्हणुन नावारूपास येणार आहे .Electrification of Parli to Latur Railway complete

परळी ते विकाराबाद या २६७ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणास केंद्र सरकारकडून २०१९ मध्ये मान्यता मिळाल्यानंतर या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम झाले . दोन वर्षात परळी -लातूररोड या ६४ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे विद्युतीकरणाचे कामही पूर्णत्वास गेले आहे .

हा प्रकल्प रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन, सिकंदराबाद प्रकल्प, सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन (CORE), प्रयागराजच्या युनिटद्वारे राबविला जात आहे. विकाराबाद – लातूर रोड (204.25 मार्ग किलोमीटर) हा विभाग विविध टप्प्यात पूर्ण करण्यात आला. लातूर रोड – परळी वैजनाथ ( 63.75 मार्ग किलोमीटर ) विभाग सुरू झाल्यामुळे विकाराबाद परळी वैजनाथ ( 268 मार्ग किलोमीटर ) पासून संपूर्ण विभाग पूर्ण झाला आहे.

यामुळे सिकंदराबाद ते परळी वैजनाथ हा संपूर्ण ब्रॉडगेज विभाग 100% विद्युतीकृत झाला आहे. विभागाच्या विद्युतीकरणामुळे विभागात अतिरिक्त गाड्या सुरू होण्यास मदत होइल. भारतातील अंदाजे 37% गाड्या डिझेल लोकोसह धावत आहेत, जे एकूण ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाच्या 4% साठी जबाबदार आहेत.

2020-21 या वर्षात एकूण डिझेलचा वापर 11,75,901 किलो लिटर होता. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे डिझेल आयातीची गरज कमी होण्यास आणि ग्रीनहाऊस गॅसेसमध्येही घट होण्यास मदत होते. यामुळे 2030 पर्यंत ‘नेट झिरो’ कार्बनचे लक्ष्य गाठण्यात मदत होऊ शकेल.

ML/KA/PGB
30 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *