नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन…
नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचे हे फोन आले आले असून 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली आहे .
आज सकाळी तीनदा लँड लाईन वर आले फोन आल्याचे सांगण्यात येत असून यापूर्वीही 14 जानेवारी रोजी धमकीचे फोन आले होते. त्यामुळे नागपूर शहर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराचा आत आणि बाहेर तसेच त्यांचा जनसंपर्क कार्यालयाचा बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.
ATS चे पथकांतर्फे घराची आणि कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जयेश पुजारी नावाच्या व्यक्तीचे नाव घेऊन हा फोन करण्यात आला असून त्यापूर्वीही याच व्यक्तींने नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला होता.
जयेश पुजारी हा बेळगाव कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दहा कोटी रुपये खंडणी मागच्या वेळी दिली नाही पण यावेळी द्या अशी धमकी फोन द्वारे मागितल्या गेल्याचं पोलिसांनी सांगितले आहे .पोलीस विविध अँगल ने तपास करीत आहेत.
ML/KA/SL
21 March 2023