ही दुमजली आता मुंबईतून होणार इतिहासजमा

 ही दुमजली आता मुंबईतून होणार इतिहासजमा

मुंबई दि.१५ ( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या ८६ वर्षांपासून दिमाखात वावरणारी तसेच प्रत्येक मुंबईकरांच्या आठवणींचा एक भाग असलेली बेस्टची दुमजली बस म्हणजेच डबल डेकर बसगाडीची आज मुंबईतील शेवटची फेरी असणार आहे .
शनिवारी हि बस सेवानिवृत्त होत आहे . मुंबईच्या इतिहासातील हे मानाचे पान उद्या काळाच्या आड जाणार आहे. या दुमजली बस बरोबर अनेक मुंबईकरांची भावनिक नाळ जोडली गेली आहे .
आज शेवटच्या या दुमजली बसला निरोप देण्यासाठी समस्त बस प्रवासी व बस प्रेमी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी आगरकर चौक अंधेरी येथे उपस्तिथ राहणार आहेत . या बसची शेवटची फेरी ४१५ या बस मार्गावर आगरकर चौक अंधेरी पूर्व ते सिपझ् दरम्यान धावणार आहे .
या बस ला निरोप देण्यासाठी आपली बेस्ट आपल्याचसाठी संघटनेने पुढाकार घेतला असून अंधेरी पूर्व येथे या बसला भावनिकदृष्ट्या निरोप देणार आहेत . त्यामुळे जास्तीत जास्त बसप्रेमी मुंबईकरांनी येथे हजार राहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे .
या कार्यक्रमासाठी बेस्ट उपक्रमातर्फे कोणतीही संमती दिली नसून साधी बसची हार तुऱ्यानी सजावट करण्यासाठी हि बेस्टने मज्जाव केला आहे . तसेच निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्याची परवानगी आज शेवटपर्यंत देण्यात आली नाही . या बसचा कोणताही कार्यक्रम करण्यात येऊ नये असे वरून आदेश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .ही दुमजली बस आता नवीन स्वरूपात आणि वातानुकूलित असणार आहे

SW/KA/SL

15 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *