लष्करी अळीचे थैमान, मका पिकाचे मोठे नुकसान

छ .संभाजी नगर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल, पिशोर, चिंचोली लिंबाची परिसरातील शेतकऱ्यावर नवीन संकट उभे ठाकले असून मका या पिकावर लष्करी अळीने थैमान घातले आहे . आधीच पाऊस नसल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्याच्या पदरात थोडा उगवलेला मका देखील मिळणार नाही अशी चिन्हे आहेत.
मका आणि इतर पिकांवर देखील मोठ्या प्रमाणावर या आळीने थैमान घातले असून शंभर टक्के मकाचे पीक नेस्तनाबूत करून टाकले आहे एका दांड्यावर किमान पाच ते सहा अळी आढळून येत आहे नियंत्रणासाठी अनेक फवारण्या करूनही याचा काहीही उपयोग होत नाही यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे.
ML/KA/SL
15 Sept. 2023