घाऊक व्यापाऱ्यांच्या गहू साठ्यावर सरकारने घातली मर्यादा

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील महिनाभरात गव्हाचे दर ४ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सरकारने घाऊक व्यापाऱ्यांची गहू साठ्याची मर्यादा ३ हजार टनांवरून २ हजार टनांपर्यंत कमी केली आहे. सरकारने १२ जून रोजी गहू साठ्यावर मर्यादा घातली होती. गव्हाचे वाढते भाव कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता पण देशातील घटलेले गव्हाचे उत्पादन आणि चालू हंगामात कमी पाऊस यामुळे गव्हाच्या भावात वाढ झाली. गेल्या महिनाभरात गव्हाचे भाव जवळपास ४ टक्क्याने वाढले होते. नेमकं याच काळात एफसीआयनेही गव्हाची विक्री सुरु ठेवली होती. सरकारने यापुर्वीच गहू निर्यातबंदीही केली होती. पण तरीही गव्हाच्या भावात वाढ झाली. त्यामुळे सरकारची चिंता वाढली.
सरकारने १२ जून रोजी साठा मर्यादा लावताना घाऊक व्यापारी आणि मोठी विक्री साखळीसाठी एकूण ३ हजार टनांची साठा मर्यादा दिली होती. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्यांना ३ हजार टन गहू ठेवता येत होता. तर किरकोळ व्यापारी आणि मोठ्या विक्री साखळ्यातील एका आऊटलेटसाठी १० टन गहू ठेवता येईल, असे सांगितले होते. प्रक्रियादारांसाठी त्यांच्या एकूण वार्षिक क्षमतेच्या ७५ टक्के गव्हाचा साठ्याची मर्यादा देण्यात आली. पण या सरकारने गव्हाचे वाढते भाव पाहून घाऊक व्यापारी आणि मोठी विक्री साखळी असलेल्या उद्योगांची साठा मर्यादा आणखी कमी केली.
सरकारने आता घाऊक व्यापारी आणि मोठी विक्री साखळी असलेल्या उद्योगांची साठा मर्यादा ३ हजार टनांवरून २ हजार टनांवर आणली. म्हणजेच साठा मर्यादा एक हजार टनाने कमी केले. तर किरकोळ व्यापारी आणि मोठ्या विक्री साखळी उद्योगाचे आऊटलेट आणि प्रक्रियादारांच्या साठा मर्यादेत कोणताही बदल केला नाही. मात्र घाऊक व्यापाऱ्यांची गहू साठ्याची मर्यादा कमी केली.
SL/KA/SL
15 Sept. 2023