हा खेळाडू होणार आता BYJU’S चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर

 हा खेळाडू होणार आता BYJU’S चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर

मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सुमारे ३.५ अब्ज फुटबॉल चाहते आहेत. यापैकी ४५० दशलक्ष लोक लिओनेल मेस्सीला सोशल मीडियावर फॉलो करतात. या चाहत्या वर्गासाठी एक आनंदवार्ता नुकतीच जाहीर झाली आहे. मेस्सी हा केवळ खेळाडू न राहता या निर्णयाने लोकांच्या मनात खास जागा निर्माण करणार हे ह्या वृत्ताने निश्चित होत आहे.

नुकत्याच हाती आलेल्या सुत्रांनुसार बायज्यूसने (BYJU’S) आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे नाव सांगितले आहे. बायज्यूच्या सामाजिक उपक्रम-शिक्षण सर्वांसाठी मेस्सी हा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणार आहे. बायज्यूस ही जगातील आघाडीच्या एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी आहे. त्यांनी घोषित केले आहे की, स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची एज्युकेशन फॉर ऑल प्रोग्रामचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार असून पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडूनही खेळतो. त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून देशात उत्तम शिक्षणाला चालना देण्यासाठी मेस्सीने बायज्यू’स सोबत करार केला आहे.

५.५ दशलक्ष भारतीयांच्या आवाजाला जगातील सर्वात मोठा आणि स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा आवाज मिळेल असे बायज्यू’स यांचे वक्तव्य आहे. बायज्यू’स एज्युकेशन फॉर ऑल प्रोग्राम हा नॉन प्रॉफिट आहे आणि देशभरातील ५.५ दशलक्ष मुलांसाठी चालवला जातो. त्याचा सामाजिक परिणामही मोठ्या प्रमाणात होतो. बायज्यू’सचे म्हणणे आहे की, जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळाडूंशी त्यांचा संबंध बायज्यू’सच्या जागतिक स्तरावर वाढेल. सर्वांसाठी चांगले आणि परवडणारे शिक्षण देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

तत्पूर्वी, जेव्हा बायज्यु’स कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ चे अधिकृत प्रायोजक बनले हे बायज्यू’सचे आणखी एक यश होय.
या दीर्घकालीन व्यस्ततेमध्ये, लिओनेल मेस्सी फिफा विश्वचषक २०२२ जिंकण्याची मोहीम करेल. मेस्सी आपला देश अर्जेंटिनाच्या विजयासाठी प्रचार करणार आहे. यासोबतच आम्ही बायज्यू’स एज्युकेशन फॉर ऑलचा प्रचार करू.

बायज्यु’स असा विश्वास आहे की लिओनेल मेस्सी हा सर्व काळातील महान विद्यार्थी आहे. फुटबॉलमध्ये काय घडू शकते हे त्याच्या कौशल्यामुळे आणि शिकण्याच्या कुतूहलामुळेच शक्य झाले. मेस्सी हा जगातील सर्वोत्तम पासर, सर्वोत्तम ड्रिबलर आणि सर्वोत्तम फ्री-किक खेळाडू मानला जातो.मेस्सी हा जगभरातील लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे, असा बायज्युसला विश्वास आहे. त्याच वेळी ते शिकून कामाची नीतिमत्ता, खेळाचा अभ्यास आणि प्रेमाची कला विकसित करण्याची प्रेरणा देतात.

TM/KA/SL

4 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *