या बँकेने केली ATM शुल्कात वाढ

मुंबई, दि. ३ : Axis बँकेने ATM शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला ) आहे. ग्राहकांना आता १ जुलैपासून एटीएम शुल्काचे आता २१ रुपयांऐवजी २३ रुपये द्यावे लागतील. अॅक्सिस बँकेने त्यांच्या बचत आणि ट्रस्ट खातेधारकांसाठी एटीएम व्यवहार शुल्कात बदल जाहीर केले आहेत. हे बदल १ जुलै २०२५ पासून लागू होतील.
अAxis बँकेने म्हटले आहे की, मोफत व्यवहार मर्यादेनंतर अतिरिक्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना आता प्रति व्यवहार २३ रुपये आकारले जातील. आतापर्यंत हे शुल्क २१ रुपये होते, म्हणजेच आता २ रुपये जास्त द्यावे लागतील. हे शुल्क अॅक्सिस बँक आणि इतर बँकांच्या ATMवर लागू असेल. याशिवाय, कर वेगळा आकारला जाईल.
ATM इंटरचेंज फी आता ATM नेटवर्कद्वारे ठरवली जाईल. तसेच, १ मे २०२५ पासून कोणत्याही बँकेच्या ग्राहकाने मोफत व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर जास्तीत जास्त २३ रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. हे नियम कॅश रिसायकलर मशीन्सना देखील लागू होतील (कॅश डिपॉझिट वगळता). , अशी अधिसूचना RBI ने मार्च २०२५ मध्ये जाहीर केली होती.
(axis bank increased atm charges