या कंपन्यांनी लाँच केली रेडी-टू-ड्रिंक दारू
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारू पिणे आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र काही अपवाद वगळता शासनाकडून मद्य विक्री आणि सेवनावर कायदेशीर बंदी नाही. मद्यविक्रीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो त्यामुळे जगभर बहुतांश ठिकाणी मद्यपान केले जाते. मद्य पिताना त्यात योग्य प्रमाणात मिक्सिंग करणे ही एक कला मानली जाते. उत्तम प्रकारे मिक्सिंग करून देणाऱ्या व्यक्तीला हॉटेल आणि हॉस्पीटॅलिटी क्षेत्रात करिअरची चांगली संधी उपलब्ध असते. मात्र अशा प्रकारे योग्य प्रमाणात पेग बनवणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे मद्यप्रेमींची ही अडचण लक्षात घेऊन आता बाजारात रेडी टू ड्रिंक मिक्स केलेली दारू दाखल झाली आहे. ॲब्सोलट वोडका आणि स्प्राइटने एक डायनॅमिक फ्यूजन बाजारात आणलं आहे. हे दोन प्रकारांमध्ये येतं ज्यामध्ये नियमित स्प्राईट आणि स्प्राईट झिरो शुगर स्पाइट मिक्स केलेलं असेल. अल्कोहोल बेव्हरेज व्हॉल्यूम (ABV) साठी जागतिक बेंचमार्क सुमारे 5% असेल, परंतू तो बाजारानुसार बदलू शकतो. म्हणजेच या ड्रिंकमध्ये सर्वसामान्यता 5 टक्के अल्कोहोल असेल.
हे ड्रिंक भारतीय बाजारात अजून लाँच झालेलं नाही, पण ते युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, स्पेन आणि जर्मनीसह निवडक युरोपियन देशांमध्ये लॉन्च झालं आहे. भारतात ते कधी आणलं जाईल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Absolut आणि Sprite रेडी-टू-ड्रिंकच्या आयकॉनिक पॅकेजिंगमध्ये जगातील दोन प्रसिद्ध ट्रेडमार्क आहेत: Absolut, प्रीमियम व्होडकाचे आंतरराष्ट्रीय प्रतीक, स्वीडनमध्ये 1879 मध्ये जन्मलेले आणि उत्कृष्ट स्वीडिश गहू आणि स्प्राइट.
SL/ML/SL
8 Nov. 2024