प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतचे उद्दिष्ट राज्याबाहेर गेलेले नाही
मुंबई दि २१– प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्याच्या घरांचं उद्दिष्ट इतर राज्यात वळवण्यात आलेलं नाही ,एकही घर दुसऱ्या राज्यात गेलेलं नाही असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. ३१ डिसेंम्बर २०२२ पर्यंत घरांचं उद्दिष्ट कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवलं होतं,त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या योजनेअंतर्गत राज्याला १४ लाख १८हजार ७८ घरांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, त्यापैकी १४ लाख१६ हजार २३ म्हणजेच ९८ टक्के घरांना मंजुरी देण्यात आली आहे, उर्वरित २ हजार ५५ घरांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे ९ लाख ९३ हजार ७७१ घरकुलं बांधून पूर्ण झाली आहेत अशी माहिती महाजन यांनी दिली.
२०२४ पर्यंत सर्वांना हकाचं घर देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, ही घरकुलं बांधण्यासाठी जागा मिळवण्याच्या अनुषंगाने काही नियम शिथिल केले जात आहेत त्याचप्रमाणे या घरांसाठी देण्यात येणारी रक्कम वाढवून देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं.
ML/KA/SL
21 March 2023