सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या १४ तारखेपासून सुरू असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे.The strike of government employees is finally over
जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील तफावत ठेवणार नाही , जुन्या पेन्शन योजना सारखा आर्थिक लाभ देण्यात येइल असे धोरण
शासनाने तत्वतः या बैठकीत स्वीकारले आहे.
सरकार हे लेखी स्वरूपात संघटनेला देणार आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक निवेदन ही केले. कर्मचारी आणि राजपत्रित अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, राज्यातील आव्हाने विचारात घेऊन त्यांनी सहकार्य केले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकार त्यांच्या सर्व मागण्यांचा सहानुभतीपूर्वक विचार करेल , सरकारने स्थापन केली आहे ती समिती आपला अहवाल सादर करेल , यानंतर कर्मचारी समन्वय समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.आज याबाबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं ही मुख्यमंत्री म्हणाले.
ML/KA/PGB
20 Mar. 2023