अवकाळी पाऊस , विरोधकांचा सभात्याग

 अवकाळी पाऊस , विरोधकांचा सभात्याग

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान , वेळेवर न होणारे पंचनामे , जुन्या पेन्शन योजनेच्या साठी सुरू असलेलं आंदोलन त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान या विषयांवर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा करण्याचा विरोधकांचा नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला आणि त्यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला .

शेतकरी हवालदिल झाले आहेत , पंचनाम्यासाठी कर्मचारी नाहीत , ते संपावर गेले आहेत असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी याचा विचार करून कामावर रुजू व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.

सत्तारूढ आमदार बेताल वक्तव्ये करतात, अध्यक्षांनी आदेश काढून सरकारला वठणीवर आणलं पाहिजे असं पवार म्हणाले. संप सुरू असेल तर सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली , गंभीर स्थिती आहे, शासनाने हतबल होऊ नये असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, आपण प्रत्यक्ष पाहणी केली आहे, कर्मचारी संपावर असले तरी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कर्मचाऱ्यांनी ही सह कार्याची भूमिका घेतली आहे, पंचनामे सुरू आहेत, आकडेवारी हातात आल्यावर मदत तातडीने जाहीर केली जाईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी कोणीही नाही, अशी स्थिती आहे, त्याला त्वरित मदत करावी अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. आभाळ फाटलं आहे म्हणून शेतकऱ्यांचं नशीब फाटलं आहे त्याला मदत करा , अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.यानंतर मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला.Unseasonal rains, opponents walk out of the meeting

काही विषय तरी राजकारण विरहित असावेत , शेतकरी अडचणीत आहे मात्र सरकार संवेदनशील आहे , कर्मचाऱ्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून संप मागे घ्यावा असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी यानंतर केलं. आमचे सर्व मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जातोय , कर्मचारी हजर आहेत , सहकार्य करत आहेत , हे संकट मोठे आहे मात्र विरोधकांनी राजकारण करू नये असं मंत्री गिरीष महाजन म्हणाले. विरोधकांच्या या सभात्यागात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मात्र सहभागी झाले नाहीत.

ML/KA/PGB
20 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *