भांडवली बाजार(Stock Market) कोसळला.

 भांडवली बाजार(Stock Market) कोसळला.

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संवत्सर २०७७ मध्ये सेन्सेक्सने व निफ्टीने जबरदस्त परतावा दिला, जवळपास ४०% returns दिले. दिनांक ४ नोव्हेंबर रोजी नवे संवत्सर २०७८ सुरु होईल,मुहूर्ताचे सौदे होतील. बाजार येणाऱ्या वर्षी देखील छान returns देतील अशी गुंतवणूकदारांची आशा आहे. पुढील काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी.व येणाऱ्या वर्षाकरिता खालच्या स्तरावर ऑटो,फार्मा, आय.टी व एफ.एम.सी.जी या क्षेत्रात गुंतवणूक करावी.
भारतीय भांडवली बाजारात या आठवड्यात विक्रमी स्तरावरून चांगलीच घसरण झाली.गेले काही दिवस बाजार सातत्याने नवनवीन शिखर गाठत होता. परंतु या आठवड्यात ह्या सगळ्याला कुठेतरी ब्रेक लागल्याचे दिसले.या आठवड्यात बँकिंग क्षेत्रात फार मोठे चढउतार दिसले.यातील महत्वाची कारणे म्हणजे या क्षेत्राचे खास करून सरकारी बँकांचे Re-rating, खाजगीकरण , तसेच merger .गेल्या बजेट मध्ये वित्तमंत्र्यांनी भारतातील पहिलीवाहिल्या ‘Bad Bank’ ची संकल्पना मांडली.( A bad bank is a organization that acquires all the NPA of a bank at a price that is below their book price). अनेक देशात अश्या प्रकारचे प्रयोग झाले परंतु ते तितके यशस्वी ठरले नाहीत. bad bank ची ‘Good bank’ कधी होईल हे सांगणे कठीण आहे. म्हणून गुंतवणूकदारानी या क्षेत्रात खास करून सरकारी बँकेतील समभागात काळजीपूर्वक गुंतवणूक करावी
बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक. Market snaps 4-day losing streak led by banks
सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी बाजाराने सकारात्मक बंद दिला.बँक निफ्टी आपल्या उच्चतम स्तरावर पोहोचली. जागतिक बाजारात संमिश्र कामकाज सुरु होते. बाजारात सुस्तीचा माहोल होता. बँकिंग क्षेत्रातील खरेदीच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून राहिली. बाजारात चढ उताराचे प्रमाण जास्त होते.कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने बाजाराची चिंता काही प्रमाणात वाढवली.बाजार बंद होताना सेन्सेक्स १४५ अंकांनी वधारून ६०,९६७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १० अंकांनी वधारून १८,१२५चा बंद दिला. Sensex, Nifty Snap Four-Day Losing Streak Aided By ICICI Bank
Tech Mahindra Q2 Result -Profit declines 1% QoQ to Rs 1,339 crore
सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स व निफ्टीत वाढ. Sensex, Nifty Gain For The Second Session. जागतिक बाजारातील दमदार संकेतांच्या जोरावर मंगळवारी भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली. बाजारात चढ उताराचे प्रमाण जास्त असून सुद्धा बाजार सकारात्मक बंद देण्यात यशस्वी ठरला. अमेरिकेतील बहुतेक कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागल्याने भारतीय बाजार स्थिर झाला. मेटल आणि ऑटो क्षेत्रात मध्ये मंगळवारी तेजी होती. तसेच मिड आणि स्मॉल कॅप समभागात ५ दिवसाच्या विक्रीला ब्रेक लागल्याने व खालच्या स्तरावरती खरेदी झाल्याने मंगळवारी बाजारात तेजी झाली.बाजार बंद होताना सेन्सेक्स ३८३ अंकांनी वधारून ६१,३५० या स्तरावर बंद झाला व निफ्टी १४३ अंकांनी वधारून १८,२६८चा बंद दिला.
Markets erased the opening gains in the final hour and end lower with Nifty below 18200.
बुधवारी जागतिक बाजारात संमिश्र प्रतिसाद होता .चीनने Evergrande कंपनीला कर्ज फेडण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने चीन मधील टेलिकॉम कंपन्यांवरती प्रतिबंध घातला अमेरिकेत सुपररीच लोकांवरती टॅक्स वाढवण्याची तयारी सुरु झाली . २५ ऑक्टोबर रोजी विदेशी संस्थांनी (Foreign Institutional Investor (FII) २३६८ करोड रुपयांची विक्री केली. तरीही भारतीय बाजाराची सुरुवात तेजीने झाली. परंतु ऑक्टोबर एक्सपायरीच्या अगोदर शेवटच्या तासाभरात बाजारात नफावसुली झाली. AXIS बँकेच्या निकालानंतर बाजार निराश झाला.मेटल.बँकिंग,एनर्जी क्षेत्रात विक्री तर ऑटो आणि PSE समभागात दबाव दिसला. IT, फार्मा, FMCG शेअर्स मध्ये खरेदी झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स २०६ अंकांनी घसरून ६१,१४३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५७ अंकांनी घसरून१८,२११चा बंद दिला.
L&T Q2 results -Adjusted profit grows 56% to Rs 1,723 crore, order inflow up 50%
Bajaj Auto Q2 PAT rises 71% to Rs 2,040 crore
Maruti Q2 Result – Profit declines 65% to Rs 475 crore, revenue rises 10% to Rs 20,539 crore
सेन्सेक्स १,३०० अंकांनी कोसळला
गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार कोसळला. सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला. मिडकॅप,स्मालकॅप समभाग गडगडले. बँकिंग,मेटल,रिअल इस्टेट समभाग सगळ्यात जास्त घसरले. १२ एप्रिल नंतरची बाजाराची सगळयात मोठी घसरण गुरुवारी झाली. फार्मा,FMCG,ऑइल अँड गॅस समभागात सुद्धा जोरदार घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. Morgan Stanley ने भारताचे रेटिंग downgrade केले तसेच काही देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने बाजारात निराशेचे वातावरण होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स १,१५८ अंकांनी घसरून ५९,९८४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३५३ अंकांनी घसरून१७,८५७चा बंद दिला.
Sensex, Nifty Log Biggest Weekly Loss In Eight Months.
नोव्हेंबर सिरीजच्या पहिल्याच दिवशी बाजार पुन्हा एकदा घसरला. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात नफावसुली पाहावयास मिळाली. बाजारात मोठया प्रमाणात चढउतार दिसला. दबावामुळे सेन्सेक्स ८००अंकांनी गडगडला. आय.टी.(IT),energy,private banks यांच्या समभागात विक्री झाली. PSU बँकांच्या समभागात मात्र खरेदी झाली. फार्मा,मेटल,रिअल इस्टेट क्षेत्रात हलक्या प्रमाणात खरेदी दिसली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६७७ अंकांनी घसरून ५९,३०६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १८५ अंकांनी घसरून१७,६७१चा बंद दिला. The stock market collapsed.
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
ML/KA/PGB
30 Oct 2021

mmc

Related post