आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचे उत्पादन….

 आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचे उत्पादन….

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंट यांसारख्या क्षेत्रांतील चांगल्या कामगिरीमुळे सप्टेंबरमध्ये आठ मूलभूत उद्योगांचे (core industries) उत्पादन (Production) 4.4 टक्क्यांनी वाढले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये 0.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज ही आठ क्षेत्रे आहेत.
या प्रमुख क्षेत्रांचा विकास दर या वर्षी ऑगस्टमध्ये 11.5 टक्के होता. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये या आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचे  वजन 40.27 टक्के आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2021 मध्ये नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंटचे उत्पादन (Production) अनुक्रमे 27.5 टक्के, 6 टक्के आणि 10.8 टक्क्यांनी वाढले.
तथापि, सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात (Production) वार्षिक तुलनेत 1.7 टक्क्यांनी घट झाली आहे. या मूलभूत उद्योगांचा (core industries) विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 16.6 टक्के राहिला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 14.5 टक्के होता.
Production of eight core industries grew by 4.4 per cent in September on the back of strong performance in sectors such as natural gas, refinery products and cement. Eight major infrastructure sectors grew by 0.6 per cent in September 2020, according to data released by the Ministry of Commerce and Industry. The eight sectors are coal, crude oil, natural gas, refinery products, fertilizers, steel, cement and electricity.
PL/KA/PL/30 OCT 2021

mmc

Related post