भांडवली बाजाराने ( Stock Market) गाठला सात महिन्याचा खालचा स्तर
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत
गेल्या आठवड्याची सुरुवातच घसरणीने झाली व शेवट देखील घसरणीनेच झाला.२४ फेब्रुवारी (भारतीय वेळेनुसार) सकाळी रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्या हल्लाला शुक्रवारी ९ दिवस पूर्ण झाले.त्यामुळे सलग ९ दिवस बाजाराने प्रचंड चढ उतार बघितले. शुक्रवारी युक्रेनच्या अणु प्रकल्पाला आग लागल्याच्या वृत्तानंतर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. बाजाराने सात महिन्याचा खालचा स्तर गाठला. मागील आठवड्यात सेन्सेक्स २.५% गडगडला. तेलाच्या वाढत्या किमती,पाश्चिमात्य देशांनी घातलेले नवे निर्बंध,रुपयाची घसरण, विदेशी गुंतवणूदारांची विक्री,कमजोरQ3 GDP चे आकडे,वीकली एक्सपायरी आणि वाढती महागाई या बाबींचा असर बाजारावर साफ जाणवला.संपूर्ण आठवडा बाजारात नकारात्मकता होती. २४ फेब्रुवारीपासून सेन्सेक्स सुमारे ३००० अंकांनी घसरला आहे. व निफ्टीत ८१८ अंकांची घट झाली आहे.
गेल्या आठवड्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) २२,५६३.०८ करोडची विक्री केली आणि भारतीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs)१६,७४२.७५ करोडची खरेदी केली.
येणाऱ्या आठवडा महत्वाचा आहे.गुंतवणूकदारांचे लक्ष रशिया व युक्रेनमधील घडामोडी, सोमवारी जाहीर होणाऱ्या पाच राज्यांचे Exit Poll ,मंगळवारी जपानचा येणारा Q4 gdp data याकडे असेल. रशियन मार्केट ८ मार्च पर्यंत बंद राहील.
बाजार तांत्रिक दृष्ट्या ओव्हरसोल्ड(Oversold market) आहे परंतु कमजोर आहे (Weak market) निफ्टीने या आठवड्यात १६,२०० चा स्तर तोडला. निफ्टीसाठी १६,००० चा स्तर महत्वाचा आहे. मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे काही विपरीत बातमी आली तर निफ्टी १५,९००चा स्तर गाठू शकते.व त्यानंतरचा सपोर्ट १५,७०० या स्तरावर आहे. बाजारात चढउताराचे प्रमाण जास्त असल्याने गुंतवणूकदारानी संधीचा फायदा उचलून दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागांची खरेदी करावी.
बाजारात अस्थिरता असून सुद्धा सकारात्मक बंद दिला. Market ends higher on another volatile day
पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या नव्या निर्बंधांमुळे आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली.सेन्सेक्स जवळपास ९०० अंकांनी पडला. परंतु खालच्या पातळीवर झालेल्या खरेदीमुळे व आशियाई बाजारातील सकारात्मकतेने भारतीय बाजार मजबूत रिकवर झाले. मेटल समभागातील खरेदीमुळे बाजारातील उत्साह वाढला. रशियन निर्यातीत घट झाल्यामुळे भारतीय पोलाद कंपन्यांच्या निर्यात व्यवसायात तेजी येण्याच्या अपेक्षेने या क्षेत्रात तेजी झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३८८ अंकांच्या वाढीसह ५६,२४७ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १३५ अंकांच्या वाढीसह १६,७९३ चा बंददिला.
तिसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढ 5.4 टक्के अशी अपेक्षेपेक्षा कमी जाहीर झाली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर 8.9 टक्के राहील असा अंदाज आहे.The Indian economy grew 5.4% in the October-December quarter and is likely to grow at 8.9% in 2021-22, according to the latest estimates released by the government’s statistical office.
फेब्रुवारीमधील GST संकलन ₹1.3L करोडअसल्याचे जाहीर झाले.परंतु जानेवारीच्या तुलनेत थोडी कमी आहे. GST collections in Feb stand at ₹1.3L cr, a slight dip from Jan
युक्रेन युद्धाचा भारतीय बाजाराला फटका. Worsening Ukraine war hits Indian market hard
बाजारावर युद्धाचा दबाव असल्याने बुधवारी बाजरात मोठी घसरण झाली सेन्सेक्स दिवसभरात १२००अंकांनी घसरला. ऑटो, बँकिंग, फार्मा समभागांची विक्री रियल्टी, एफएमसीजी, आयटी समभागांवरही दबाव यामुळे बाजार घसरला. परंतु त्याच वेळी, मिडकॅप, स्मॉलकॅप समभागांमध्ये खालच्या स्तरावरून रिकव्हरी दिसून आली. कमजोरQ3 GDP चे आकडे व चा FY22 GDP वाढीच्या दरात घट झाल्याने बाजारात अजून नकारत्मकता पसरली.क्रूड ऑईलचे भाव सुद्धा प्रचंड वाढल्याने बाजारावर दबाव आला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७७८ अंकांच्या घसरणीसह ५५,४६९ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १८८ अंकांनी घसरून १६,६०६ चा बंददिला.
अस्थिरतेमुळे निफ्टी १६,५०० च्या खाली बंद . Nifty ends below 16,500 amid high volatility
सलग दुसर्या दिवशी भारतीय इक्विटी बेंचमार्क खालच्या स्तरावर बंद झाले.युध्यजन्य परिस्थितीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती. वीकली एक्सपायरीचा दबाव देखील होता. प्रामुख्याने ऑटो आणि बँकिंग क्षेत्रात मोठी घसरण झाली.बाजराची सुरुवात गॅप अप ओपनिंगने झाली होती परंतु अस्थिरतेमुळे बाजार घसरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६६ अंकांच्या घसरणीसह ५५,१०२ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १०८ अंकांनी घसरून १६,४९८ चा बंददिला.
सलग तिसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची नफावसुली
सलग तिसऱ्या दिवशी गुंतवणूकदारानी नफावसुली केली. वाढत्या जिओ पॉलिटिकल तणावाचा असर बाजारावर साफ दिसून आला सेन्सेक्स १२००अंकांनी घसरला .बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली व हि घसरण वाढतच गेली. युक्रेन मध्ये असलेल्या युरोपातील सर्वात मोठ्या अणु प्रकल्पावर रशियन हल्ल्याने तणाव वाढला तसेच क्रूड ऑइलच्या किमतीतील भाववाढ. तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्या मधील अनिश्चितता यामुळे उद्भवणारी महागाई RBI च्या सहनशीलतेची पातळी ओलांडू शकते अशी भीती निर्माण झाली. या सत्रात BSE मधील सगळ्या क्षेत्रात पडझड झाली. मिडकॅप व स्मालकॅप शेअर्स मध्ये सुद्धा घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७६८ अंकांच्या घसरणीसह ५४,३३३ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने २५२ अंकांनी घसरून १६,२४५ चा बंददिला. Markets see-sawed in the trade as Russia’s invasion of Ukraine escalated, with Russian forces attacking and seizing control over Europe’s largest nuclear power plant earlier today.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com
ML/KA/PGB
5 Mar 2022