भांडवली बाजाराला(Stock Market) केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतीक्षा.

 भांडवली बाजाराला(Stock Market) केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतीक्षा.

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत

गेला आठवडा बाजारासाठी नवीन वर्षातील दुसरा खराब आठवडा ठरला. जागतिक बाजरातील पडझडीचा व नकारात्मक वातावरणाचा असर भारतीय बाजारावर ठळकपणे जाणवला.भारतीय बाजार प्रचंड कोसळले. संपूर्ण जग ज्या मीटिंगची वाट बघत होते त्या फेडच्या मीटिंग मध्ये अखेर मार्चपासून व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.फेडच्या या कडक संकेतानंतर जागतिक बाजार पुन्हा घसरले.रशिया व युक्रेन मधील वाढत तणाव,कच्च्या तेल्याच्या किमतीतील वाढ, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, डॉलर मधील मजबूती,विधानसभेच्या निवडणूका, व मंथली एक्सपायरी या कारणांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले.मार्केटमध्ये चहुबाजूनी विक्रीचा मारा झाला. शुक्रवारी प्री बजेट रॅली आली. परंतु जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे वरच्या स्तरावरून बाजरात पुन्हा एकदा घसरण झाली.Market extended profit booking in the second week

या आठवड्यात सेन्सेक्समध्ये १८३६.९५ अंक(३%) व निफ्टीत ५१५.२(२.९२%) इतकी घसरण झाली. Reliance Industries, Tata Consultancy Services, Infosys आणि HDFC Bank या दिग्गज समभागात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) २२,१५८.१५ करोडची विक्री केली त्याबरोबर भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १०,८४९. ४०. करोडची खरेदी केली. FIIs sold equities worth of Rs 22,158.15 crore, and DIIs bought equities worth of Rs 10,849.40 crore. रुपयात ६२ पैशानी घसरण झाली.

येणाऱ्या आठवडयात अर्थसंकल्प सादर होणार असल्याने हा आठवडा महत्वाचा आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या (FIIs) खरेदी विक्रीच्या आकड्यांचा प्रभाव बाजारावर राहील. शुक्रवारी अमेरिकन बाजाराने मोठी उसळी घेतली डाऊ जोन्स ५६४ अंकांनी वाढला (Wall Street surged on Friday). २०२२ मधील सगळ्यात चांगला दिवस म्हणून नोंद झाली.अमेरिकन बाजरातील तेजीचा चांगला परिणाम सोमवारी भारतीय बाजारावर दिसेल.

जागतिक बाजारात घसरण. सेन्सेक्स १९०० अंकांनी कोसळला

फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बुधवारी होण्याऱ्या बैठकीआधी जागतिक बाजारात प्रचंड कमजोरी दिसण्यात आली. याचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजाराला बसला.बाजाराच्या निर्देशकात ३ टक्के घसरण झाली. सेन्सेक्स जवजवळ २००० अंकांनी गडगडला.कोविडचा संसर्ग सुरु झाल्यानंतर ,मार्च २०२० नंतर एका दिवसातील सगळ्यात मोठी घसरण झाली. सोमवारी मार्केटमध्ये चहुबाजूनी विक्रीचा मारा झाला.त्यात भर घातली ती रशिया व युक्रेन मधील तणावाने,जागतिक बाजरात तेल्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली. त्यामुळे बाजरात फ्री फॉल (free fall,) दिसला.भारताच्या वोलॅटिलिटी इंडेक्स मध्ये( VIX Volatility Index) २३% वाढ होऊन तो २३ अंकांवर पोहोचला हे बाजरात घबराट निर्माण झाल्याचे लक्षण होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स १५४५ अंकांनी घसरून ५७,४९१ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४६८ अंकांनी घसरून १७,१४९ चा बंददिला. Markets extend fall to the fifth straight session amid an across-the-board sell-off.

बाजाराची खालच्या स्तरावरून शानदार उसळी. Markets made a smart recovery

सलग पाच दिवसांच्या पडझडीला मंगळवारी बाजाराने लगाम लावला. सकाळच्या कमजोर सुरुवाती नंतर बाजार अत्यंत स्मार्ट पद्धतीने रिकवर झाला. पश्चिमी देशांकडून चांगले संकेत जाणवल्याने निफ्टीत खालच्या स्तरावरून ४३० अंक व सेन्सेक्समध्ये १,४५२ अंकांची सुधारणा झाली. बाजरात खालच्या स्तरावर चांगली खरेदी झाली. ऑटो आणि फायनांशियल (auto, financials) मधील तेजीमुळे निफ्टीने १७,३०० पर्यंत मजल मारली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६६ अंकांनी वधारून ५७,८५८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १२८ अंकांनी वधारून १७,२७८ चा बंददिला. Markets reversed losses during the second half of the trading session as global markets looked to stabilise post a manic Monday.

फेडच्या कडक भूमिकेमुळे बाजारात घबराट. Market spooked by Fed’s hawkish stance

मंगळवारच्या सत्रात चांगली रिकवरी होऊन सुद्धा गुरुवारी बाजरात पुन्हा एकदा घसरण झाली. जागतिक बाजरातील पडझडीच्या फटका भारतीय बाजाराला बसला. यू.एस फेडच्या संकेतानुसार मार्च मध्ये व्याजदर वाढविण्यात येणार असल्याने जागतिक बाजार कोसळले. भरतोय बाजाराची सुरुवात देखील घसरणीनेच झाली सेन्सेक्स १३०० अंकांनी घसरला.रशिया व युक्रेन मधील तणाव, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, डॉलर मधील मजबूती,राजांच्या निवडणूका, व मंथली एक्सपायरी या कारणांनी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. दिवसाखेर बाजारात काहीसा सावरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५८१अंकांनी घसरून ५७,२७६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १६७ अंकांनी घसरून १७,११०चा बंददिला. Sensex, Nifty Decline Dragged By I.T. Stocks After Fed Hints At Faster Rate Hike Path.

दमदार सुरुवातीनंतर बाजारात घसरण. The market fell after a strong start

मागील सत्रातील घसरणीनंतर शुक्रवारी बाजाराची सुरुवात दमदार झाली बाजरात प्री बजेट रॅली बघावयास मिळाली सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढला निफ्टीने सुद्धा द्विशतक ठोकले परंतु युरोपियन बाजारातील कमजोरीने या तेजीवर पाणी फिरले मार्केटमध्ये शार्प सेलिंग पाहावयास मिळाली. शेवटच्या तासात सकाळच्या तेजीचे रूपांतर मंदीत झाले. बाजारात जोरदार चढउतार होता.या आठवड्यात झालेल्या प्रचंड विक्रीनंतर IT, realty आणि Mid व Smallcaps क्षेत्रात थोडी खरेदी पाहावयास मिळाली.. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७६ अंकांनी घसरून ५७,२०० या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८ अंकांनी घसरून १७,१०१ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

 

ML/KA/PGB

29 Jan 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *