सेन्सेक्सने ६०,००० चा टप्पा प्रथमच केला पार.
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात सेन्सेक्सने प्रथमच ६०,००० चा टप्पा पार केला. कोविडच्या संकटातून बाजार हळूहळू सावरायला लागला आहे. सरकार व रिझर्व्ह बँकेने उचललेली ठोस पावले,कमी व्याज दर,अर्थव्यवस्थेत होणारी थोडी सुधारणा ,वॅक्सीनेशन मध्ये होणारी झपाट्याने वाढ,विदेशी गुंतवणूकदारांचे पुन्हा भारतीय बाजाराकडे वळलेले पाय या सगळ्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला आहे.
या आठवडयात बाजारावर जागतिक बाजारातील घडामोडी, चीन मधील रिअल इस्टेट कंपनी Evergrande वरील दिवाळखोरीचे संकट, अमेरिकन फेडची बैठक(US Fed),सप्टेंबरमध्ये मालमत्ता नोंदणीमध्ये झालेली वाढ(property registration), काही राज्यांनी स्टॅम्प ड्युटी(stamp duty) मध्ये केली कपात या सगळ्याचा प्रभाव दिसला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी.
वैश्विक बाजारातील कमजोरीचा भारतीय बाजारावर परिणाम सेन्सेक्स ६०० अंकांनी घसरला.
जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका सोमवारी भारतीय बाजाराला बसला. चीन मधील प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठयावर असल्याने त्याचा फटका मेटल क्षेत्राला चांगलाच बसला. China’s second largest realtor Evergrande likely to default on a $83.5 million interest. टाटा स्टील चा समभाग १०% घसरला. अमेरीकेमध्ये बुधवारी होणारी फेडची बैठक( Federal Reserve’s policy decisions) ,युरोप मधील एनर्जी क्रायसेस(Europe energy crisis) याचा प्रभाव सुद्धा बाजारावर जाणवला तसेच भारतीय बाजारात काही दिवसात प्रचंड वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. आय.टी.सी (ITC) च्या समभागाने बाजार सावरण्यास मदत केली परंतु बाजार पुन्हा घसरला.बाजार बंद होताना सेन्सेक्स ५२४ अंकांनी घसरून ५८४९० या स्तरावर बंद झाला व निफ्टी १८८ अंकांनी घसरून १७३९६ चा बंद दिला. Sensex, Nifty end lower on weak global cues.
सोमवारच्या पडझडीनंतर बाजाराने घेतली पुन्हा उसळी indices made a smart comeback after two days of selling
मंगळवारी बाजारात तेजी पसरली. Dow future आणि European बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये जोश पसरला. बाजारात दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्सने ५०० हून अधिक अंकांची उसळी घेतली. आय.टी(IT) ,मेटल(Metal),आणि एफएमसीजी(FMCG) क्षेत्रातील तेजीमुळे बाजार सावरण्यास मदत झाली. बाजाराचे लक्ष बुधवारी होणाऱ्या यु एस फेड(US FED) च्या बैठकीकडे होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५१४ अंकांनी वधारून ५९,००५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १६५ अंकांनी वधारून १७,५६२चा बंद दिला.
आशादायक सुरुवाती नंतर बाजार घसरला. Markets end lower after a promising start.
दिवसभरातील चढ उतारानंतर बुधवारी मार्केटने वीकली एक्सपायरीच्या अगोदर सपाट बंद दिला. मंगळवारी जोरदार उसळी घेऊन सुद्धा बुधवारी बाजार दिवसभरात एका पातळीभोवती फिरत होता.रिअल इस्टेट,आय.टी(IT)मेटल(Metal),हॉटेल ,तसेच मल्टिप्लेक्स क्षेत्रात तेजी होती. एफएमसीजी आणि ऑइल -गॅस क्षेत्रात दबाव होता.सप्टेंबरमध्ये मालमत्ता नोंदणीमध्ये वाढ झाल्यामुळे रिअल्टी स्टॉक फोकसमध्ये होते.Realty stocks were in focus owing to an increase in property registrations in September. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७७ अंकांनी घसरून ५८९२७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५ अंकांनी घसरून १७,५४६ चा बंद दिला
सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजार नव्या विक्रमी उच्च पातळीवर बंद झाले.Markets end at fresh record closing high levels amid positive global cues.
शेअर बाजारात गुरुवारी धमाकेदार तेजी पाहावयास मिळाली. अमेरिकन फेड चा बाजाराला अपेक्षित निकाल त्यामुळे जागतिक बाजारात उसळलेली तेजी,युरोप,फ्रान्स आणि जर्मनी मधील बाजारात १% अधिक वाढ,चीन मधील प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनी Evergrande चे संकट कमी होण्याची लक्षणे,या सगळ्याचा परिणाम बाजारावर झाला. दिवसभरात बाजाराने नवा उच्चांक गाठला सेन्सेक्सने ५९,९५७ व निफ्टीने १७,८४३ चा विक्रमी स्तर गाठला. गुंतवणूकदारांनी बाजाराचा ताबा घेतला.बाजारात चौफेर खरेदी झाली. IT, metal, infra, PSU bank आणि energy क्षेत्रात १% अधिक वाढ झाली. Nifty realty index ने ११ वर्षाचा नवा उच्चांक केला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ९५८ अंकांनी वधारून ५९,८८५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २७६अंकांनी वधारून १७,८२३चा बंद दिला
सेन्सेक्स प्रथमच ६०,००० या नव्या विक्रमी उच्च पातळीवर बंद झाला. Sensex Closes Above 60,000 For The First Time.
बाजाराने शुक्रवारी आपली विक्रमी घोडदौड चालूच ठेवली.सेन्सेक्सने प्रथमच ६०,००० चा टप्पा पार केला. दिवसभरात निफ्टीचा स्तर १८,००० च्या जवळ पोहोचला. बाजारात पुन्हा एकदा बुल्सचा दबदबा दिसला.रिअल इस्टेट,फर्टीलायझर, आय.टी क्षेत्रात चांगली तेजी पाहावयास मिळाली. मिडकॅप शेअर्स मध्ये वरच्या स्तरावर नफावसुली पाहावयास मिळाली. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ६०,३३३ व १७,९४७ असा नवा विक्रमी उच्चांक गाठला.The Sensex crossed the 60,000 level for the first time.
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
ML/KA/PGB
25 Sep 2021