सलग तिसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजार(Stock Market) घसरला
मुंबई, दि. १२ (जितेश सावंत) : 11 ऑगस्ट रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजार घसरला.मार्केटने 5 महिन्यांत पहिल्यांदाच सलग तीन आठवडे नुकसान नोंदवले. सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी 0.5% पेक्षा जास्त घसरले तर मिडकॅप इंडेक्स 0.5% वाढले. महागाईच्या अंदाजात वाढ केल्याने आणि बँकांसाठी अतिरिक्त 10 टक्के वाढीव रोख राखीव प्रमाण (ICRR) कायम ठेवण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्णयामुळे बाजाराने निकालाला थंब्स-डाउन दिले व बाजार घसरला.
औद्योगिक उत्पादन- industrial growth
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) जूनमध्ये 3.7 टक्क्यांवर घसरला. गेल्या तीन महिन्यांतील हा सर्वात कमी आयआयपी आकडा आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. India’s industrial growth falls to 3.7% in June.
पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष 14 तारखेला जाहीर होणाऱ्या भारताच्या CPI डेटा,जागतिक घडामोडी,
विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका याकडे असेल. १५ऑगस्ट रोजी बाजार स्वातंत्र्यदिनानिमित्त बंद राहतील.
Technical view on nifty-. बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता वाढताना दिसली.बाजार तांत्रिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. शुक्रवारी निफ्टीने 19428.3 चा बंद भाव दिला.निफ्टी साठी 19412-19385 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19361-19327-19300-19246 हे स्तर गाठेल. वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 19462-19535-19562 हे स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरतील.
सेन्सेक्स 232 अंकांनी वधारला
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि सलग दुसऱ्या दिवशी बाजार बढत घेण्यात यशस्वी ठरला. फार्मा आणि आयटी क्षेत्रातील मजबूत कामगिरीमुळे बाजारात वाढ झाली.आगामी महागाई डेटा आणि आरबीआयच्या चलनविषयक धोरणाच्या (RBi policy) पार्श्वभूमीवर बाजारात सावधगिरी बाळगली गेली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 232.23 अंकांनी वधारून 65,953.48 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 80.30 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,597.30 चा बंद दिला. Sensex up 232 points
सेन्सेक्स, निफ्टी खालच्या पातळीवर मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर निर्देशांक सपाट उघडले आणि अत्यंत अस्थिर अश्या वातावरणात भारतीय निर्देशांकांनी मागील सत्रातील काही नफा मिटवला त्याने बाजार खालच्या पातळीवर बंद झाला.रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे धोरण आणि आठवड्याच्या अखेरीस महत्त्वाचा डेटा जाहीर होण्याआधी गुंतवणूकदार सावध होताना दिसले.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 106.98 अंकांनी घसरून 65,846.50 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 26.50 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,570.80 चा बंद दिला. Sensex, Nifty end lower
शेवटच्या तासातील खरेदीमुळे सेन्सेक्स 149 अंकांनी वाढला मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सुरुवात सपाट झाली. परंतू जसा दिवस पुढे सरकत गेला तशी बाजारातील घसरण वाढत गेली. मात्र शेवटच्या तासातील खरेदीने सर्व तोटा पुसून टाकला आणि बाजार मागील सत्रापेक्षा वरच्या स्तरावर बंद झाला.रिअल्टी आणि बँकिंग वगळता सर्व क्षेत्रांमध्ये झालेल्या खरेदीमुळे RBI च्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयाच्या एक दिवस आधी अत्यंत अस्थिर अश्या सत्रात भारतीय इक्विटी बेंचमार्क उच्च पातळीवर बंद झाले.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 149.31 अंकांनी वधारून 65,995.81वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 61.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,632.50 चा बंद दिला. Sensex ends 149 pts up on late buying
अतिरिक्त CRR आणि महागाईचा अंदाज यामुळे बाजारात घसरण
अत्यंत शांत सुरुवातीनंतर बाजारात दबाव वाढला व बाजार घसरला.बँकांसाठी अतिरिक्त 10 टक्के वाढीव रोख राखीव प्रमाण (ICRR) कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) धोरण बैठकीत बाजाराने निकालाला थंब्स-डाउन दिले तसेच महागाईच्या अंदाजात वाढ केल्याने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 307.63 अंकांनी घसरून 65,688.18 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 89.40 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,543.10 चा बंद दिला. Additional CRR, inflation forecast drags Nifty below 19,550
निफ्टी 19450 च्या खाली
नकारात्मक सुरुवातीनंतर दिवस पुढे जात असताना बाजरातील घसरण वाढत गेली परंतू दुपारी त्यात सुधार झाला. पण तो अयशस्वी ठरल्याने बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीजवळ बंद झाला. पीएसयू बँका वगळून सर्व क्षेत्रांतील विक्रीमुळे भारतीय इक्विटी बाजार सलग दुसऱ्या सत्रात घसरला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 365.53अंकांनी घसरून 65,322.65 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 114.80 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,428.30 चा बंद दिला.Nifty below 19,450
( लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )
jiteshsawant33@gmail.com