भांडवली बाजाराची (Stock Market) संवत2079 ची सांगता वधारून झाली.
मुंबई, दि. ११ (जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, संवत 2079 ची सांगता बाजार वधारून झाली.संपूर्ण आठवड्यात बाजारात चढ उतार पाहावयास मिळाले. बाजारासाठी संवत 2079 हे वर्ष चांगले ठरले. व्याजदरातील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाच्या(geopolitical tensions) पार्श्वभूमीवर सेन्सेक्समध्ये 9% वाढ झाली आणि स्मॉलकॅप निर्देशांक 30% पेक्षा जास्त वाढले.
गेल्या दिवाळीपासून, निर्देशांकांनी डिसेंबर 2022 मध्ये लाइफटाईम उच्चांक गाठला, त्यानंतर मार्चमध्ये 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर जाऊन सप्टेंबरमध्ये पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला.अशा गोंधळानंतरही, निफ्टी 50 ने संवत 2079 मध्ये गुंतवणूकदारांना जवळपास 10% परतावा दिला.
बाजारासाठी संवत 2080 कसे राहील.
पहिले सहा महिने , देशामधील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल तसेच RBI ची व्याजदरासंबंधीची भूमिका आणि राष्ट्रीय निवडणूक (National Polls) ,US Fed ची भूमिका ,तिमाही निकाल ह्या बाबी बाजारासाठी अत्यंत महत्वाच्या ठरतील.
त्यानंतरचे सहा महिने बाजार स्थिरस्थावर होईल,financials , cement तसेच अमेरिकन इकॉनॉमी सावरल्यास IT क्षेत्रातील समभाग चमकदार कामगिरी दाखवतील.
गुंतवणूकदारानी मार्केटमधील पडझडीचा लाभ घेऊन क्वालिटी शेअर्स मध्ये दीर्घ काळाकरिता गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. ह्या वर्षी सोन्याची कामगिरी देखील चमकदार राहील. स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ह्या कंपन्यात सावधतेने गुंतवणूक करावी. जर बाजाराला अपेक्षित असे निवडणुकांचे निकाल लागले तर निफ्टी 22000 ते 24000 पर्यंतची पातळी गाठू शकते.
मुहूर्त- ट्रेडिंग वेळ 2023 आणि तारीख
BSE आणि NSE दिवाळीच्या दिवशी ‘मुहूर्त’ ट्रेडिंग सत्र म्हणून ओळखले जाणारे एक तासाचे विशेष सत्र आयोजित करतात. यावर्षी रविवार, 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7:15 या वेळेत हे सत्र होणार आहे.
सेन्सेक्स 595 अंकांनी वधारला
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी पाहावयास मिळाली. गॅप अप सुरुवातीनंतर बाजारात PSU बँका वगळता सर्व क्षेत्रात खरेदी दिसून आली. शेवटच्या तासात निफ्टीने 19,400 चा टप्पा ओलांडला. शुक्रवारी अपेक्षेपेक्षा कमी यूएस नोकऱ्यांच्या डेटामुळे फेड भविष्यात दर वाढवण्यापासून परावृत्त होईल अशी आशा पल्लवित झाली. त्याचा असर भारतीय बाजारावर देखील दिसला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 594.91अंकांनी वधारून 64,958.69 वर बंद झाला.
दुसरीकडे निफ्टीत 181.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,411.80 चा बंद दिला. Sensex zooms 595 pts, Nifty tops 19,400
तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सलग तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागताना दिसला. दिवसभर बाजारातील व्यवहार अस्थिर राहिले. चीनकडून संमिश्र आर्थिक आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तीन दिवसांपासून वाढलेला कल संपुष्टात आला. याशिवाय फायनान्शिअल आणि रियल्टी कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीमुळेही बाजार खाली आला. तथापी, अंतिम तासाच्या खरेदीमुळे बाजारातील तोटा कमी होण्यास मदत झाली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 16.29 अंकांनी घसरून 64,942.40 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 5.05 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,406.70 चा बंद दिला. Sensex, Nifty take breather after 3-day winning run
निफ्टी 19,450 च्या खाली
मंगळवारचा ट्रेंड सुरू ठेवत बाजार बुधवारी मर्यादेत राहिला आणि किंचित वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी शेवटपर्यंत छोट्या श्रेणीत फिरत राहिला आणि शेवटी 19443.50 च्या पातळीवर बंद झाला.बुधवारी जागतिक बाजारात नकारात्मक कल दिसून आला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सतत भांडवल काढून घेतल्याने बाजारात अस्थिरता दिसून आली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 16.29 अंकांनी घसरून 64,942.40 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 5.05 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,406.70 चा बंद दिला.
Nifty ends below 19,450 in range bound trade
सेन्सेक्स 143 अंकांनी घसरला
दोन दिवसांच्या फ्लॅट क्लोजिंग नंतर अस्थिरतेमुळे बाजार नकारात्मक नोटवर बंद झाले. बाजाराची सपाट सुरुवात झाल्यानंतर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. परंतु नंतर बहुतांश वेळ बाजार खालच्या पातळीवरच राहिला. बंद होताना खालच्या पातळीच्या जवळ बंद झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 143.41 अंकांनी घसरून 64,832.20 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 48.20 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,395.30 चा बंद दिला.
Sensex falls 143 pts
दिवसभराच्या अखेरीस बाजार वधारला.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार कन्सॉलिडेशन च्या मूड मध्ये होता. बहुतांश सत्रात खालच्या स्तरावर व्यवहार केल्यानंतर निर्देशकांनी बँकिंग, वित्तीय , तेल आणि वायू समभागांमध्ये खरेदी झाल्याने वर येण्यात यश मिळवले. किरकोळ चलनवाढ खाली येण्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञ व्यक्त करत असल्याने गुंतवणूकदार थोडे निर्धास्त झाले.शिवाय, सतत म्युच्युअल फंडाचा ओघ आणि दिवाळीच्या सण यामुळेही बाजारात काही प्रमाणात खरेदी झाली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 72.48 अंकांनी वधारून 64,904.68 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 30.05 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,425.35 चा बंद दिला. Fag-end buying in pvt banks, RIL help lift Sensex 72 pts, Nifty atop 19,400
( लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Techncal and Fundamental Analyst आहेत )
jiteshsawant33@gmail.com
SJ/KA/SL
11 Nov. 2023