मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केनिया सरकारने 2024 च्या वर्षाअखेरीपर्यंत या भारतीय वंशाच्या दहा लाख कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला. केनिया सरकारचे म्हणणे आहे की, हे कावळे लोकांना त्रास देत आहेत आणि स्थानिक पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. केनियन सरकारला पर्यटनातून सर्वात जास्त फायदा होतो. परंतु केनियाच्या किनारी भागात या कावळ्यांचा उपद्रव जास्त प्रमाणात आहे. केनियात आलेल्या पर्यटकांसाठी हे कावळे त्रासदायक ठरत आहेत. पर्यटक जेवायला बसल्यावर कावळे त्यांना त्रास देतात. याचा फटका केनिया मधील पर्यटन व्यवसायावर पण होत आहे. पर्यटनावरच केनियाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. असे केनिया सरकारचे म्हणणे आहे. केनिया सरकारच्या या आगळ्या वेगळ्या निर्णयामुळे जगभरातील प्राणी व पक्षी प्रेमी याला विरोध करत आहेत. The crows, which are of Indian origin, shocked the country of Kenya
1940 च्या आसपास भारतीय वंशाचे कावळे संपूर्ण आफ्रिकेत आले. या कावळ्यांमुळे आफ्रिकेतील परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो असे केनियन सरकारचे म्हणने आहे. केनियाच्या परिसंस्थेत तितकेसे महत्त्वाचे नाहीत असे केनिया सरकारचे म्हणणें आहे. केनियन वाईल्डलाईफ सर्व्हिसच्या मते भारतीय कावळा हा परदेशी पक्षी आहे. तो मूळचा केनिया मधील नाही. हे पक्षी केनियाच्या समुद्रकिनारच्या भागातच जास्त उपद्रव करत आहेत. जेथे हॉटेल्स ची संख्या जास्त आहे. आणि त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावर पर्यटन चालते. आणि या पक्षांमुळे केनियाच्या पर्यटनावर परिणाम गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळेच केनिया सरकारने या कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे.
ML/ML/PGB
23 Jun 2024