आता या संस्थांचा कारभार NFDC च्या ताब्यात

 आता या संस्थांचा कारभार NFDC च्या ताब्यात

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपट विभाग (Film Division of India), चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया (Children’s Film Society of India ) , नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (National Film Archive of India) आणि डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स (Directorate of Film Festival) या चार सरकारी चित्रपट संबंधित संस्था आता राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये (National Film Development Corporation) मध्ये औपचारिकपणे विलीन करण्यात आल्या आहेत.

उद्या दि. 1 जानेवारी 2023 पासून या संस्था अधिकृतपणे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या भाग होणार आहेत. संबंधित संस्थाच्या  सध्याच्या पायाभूत सुविधांचा आणि कर्मचाऱ्यांच्या अधिक  चांगल्या वापरासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला होता. अखेर आज या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झाली. लघुपट आणि माहितीपट निर्मिती, चित्रपट महोत्सवांचे आयोजन आणि चित्रपटांचे जतन करण्याचे अधिकार मंत्रालयाने औपचारिकपणे NFDC कडे हस्तांतरित केले आहेत.

SL/KA/SL

31 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *