‘ठाकरे : प्रबोधनकार ते आदित्य ; ठाकरे ब्रँड म्हणजे काय, हे सांगणारे पुस्तक!

 ‘ठाकरे : प्रबोधनकार ते आदित्य ; ठाकरे ब्रँड म्हणजे काय, हे सांगणारे पुस्तक!

मुंबई दि २ : प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जीवनकार्यासंबंधी माहितीपर काही पुस्तके मराठीत प्रकाशित झाली आहेत. पण प्रबोधनकार, बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य या ठाकरे कुटुंबातील व्यक्तींवर एकत्रित माहिती असलेले ‘ठाकरे – प्रबोधनकार ते आदित्य’ असे पुस्तक प्रथमच मराठी साहित्यक्षेत्राच्या दालनात दाखल झाले आहे.
लेखक – पत्रकार आणि शिवसेना अभ्यासक योगेंद्र ठाकूर यांनी लेखन – संपादन केलेल्या या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांच्या बहुरंगी, बहुढंगी आणि बहुरूपी व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे.

बहुजनांचे कैवारी असलेले महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतिहासविषयक असलेले कार्य नव्या पिढीला कळण्यासाठी त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व रेखाटतांना पुस्तकात ‘बाळासाहेब आणि शिवसेना’, ‘व्यंगचित्रकार अग्रलेखकार – बाळासाहेब’ , ‘प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब’ , ‘मराठी भाषाप्रेमी, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्ररक्षक बाळासाहेब’, ‘प्रखर राष्ट्रवादी बाळासाहेब’,
‘जातपात न पाळणारे बाळासाहेब’ यांच्याविषयी उद्बोधक लिखाण या पुस्तकात आहे.

उद्धव ठाकरे यांचे समाजकारण व राजकारण आणि हिंदुत्वाचे विचार हे ठाकरे कुटुंबाचे सर्वसमावेशक हिंदुत्व असल्याचे दाखवते तर ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आदित्य ठाकरेंच्या रूपाने सक्रिय झाली आहे. या युवा नेतृत्वाविषयी थोडक्यात माहिती या पुस्तकात दिली आहे.
यापूर्वी देखील शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवरील काही पुस्तकांचे लिखाण योगेंद्र ठाकूर यांनी केले आहे. त्यात बाळासाहेब, ‘साहेब – एकच वाघ’ , ‘शिवसेना- समज – गैरसमज’ , ‘शिवसेना @५०’, ‘ठाकरे एक विचार धगधगता’ आदी पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रातील आजच्या सद्य परिस्थितीत व गोंधळलेल्या वातावरणात ठाकरे कुटुंबाचा आधार महाराष्ट्राला वाटतो हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न ‘ठाकरे : प्रबोधनकार ते आदित्य’ या पुस्तकात योगेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला, राजकीय अभ्यासकांना, पत्रकारांना आणि युवासैनिकांना ठाकरे कुटुंबाची सामाजिक व राजकीय योगदानाची महती आणि माहिती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल !

पुस्तकाचे नाव – ठाकरे : प्रबोधनकार ते आदित्य
लेखन व संपादन – योगेंद्र ठाकूर
मूल्य रुपये ३५० /- फक्त
आमोद प्रकाशन, मुंबई.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *