‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचा टीझर रिलिज
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) महापरिनिर्माण दिन आहे.डॉ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाचा संघर्ष दाखवणारे अनेक चित्रपट आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, आता एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच ‘महापरिनिर्वाण’ नावाच्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या कोऱ्या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता प्रसाद ओक याने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ‘महामानवाच्या दिव्य आणि तेजस्वी राखेच्या कणांतून घडलेली…एक ऐतिहासिक गोष्ट..! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन!’, असे म्हणत प्रसाद ओकने हा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातून ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्यांच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकसह, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत, विजय निकम, हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शैलेंद्र बागडे यांनी सांभाळली आहे.
SL/KA/SL
6 Dec. 2023