नवी मुंबईतून ४८ तासांत ६ अल्पवयीन मुले बेपत्ता
नवी मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील कामोठे, कळंबोली, कोपरखैरणे, रबाळे आणि पनवेलमधून गेल्या 48 तासात 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यामुळे पालकांमध्ये भीती पसरली आहे. बेपत्ता झालेली सर्व मुलं ही 12 ते 15 वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. या मुलांच्या पालकांनी त्यांचे अपहरण झाल्याच्या तक्रारीही पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. दरम्यान या 6 बेपत्ता मुलांपैकी एकाचा शोध लागला असून पोलीस 5 जणांचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांक असल्याचे धक्कादायक वास्तव नुकत्याच जाहीर झालेल्या एनसीआरबीच्या (NCRB) अहवालातून समोर आले आहे. या अहवालानंतर बुधवारी नवी मुंबईतून समोर आलेल्या या बातमीमुळे पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पालिकांनी पालकांनी आपल्या मुलांच्याबाबतीत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आता अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटनांमुळे नवीमुंबईकरांची चिंता वाढली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा तपास पोलीस प्रशासनाकडून वेगाने कारवाई केली जात आहे.
SL/KA/SL
6 Dec. 2023