तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांचा संप कायम

मुंबई , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपकरी तहसीलदार,नायब तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी ठोस आश्वासन मिळेपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांची बैठक आज महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत वेतनश्रेणी वाढी बाबत सकारात्मक चर्चा झाली. महसूल मंत्री हे स्वतः उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करणार असल्याचे समजते. त्यामुळे सकारात्मक चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात जोवर हातात ठोस आश्वासन मिळत नाही तोवर संप कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.
ML/KA/PGB 5 APR 2023